विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आर आर आर सिनेमातल्या नाटू नाटू गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जगात त्या गाण्याची धूम आहे आणि त्या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यावर तर, भारतात सर्वत्र आनंदाचे उधाण आले आहे. असे असताना काँग्रेसला मात्र त्याचे फार वाईट वाटल्याचे दिसत आहे. कारण सगळीकडून नाटू नाटू वर अभिनंदनचा वर्षाव होत असताना काँग्रेसने मात्र लूटो लूटो म्हणत त्या गाण्याची खिल्ली उडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. Natu Natu boom around the world; Congratulation after winning an Oscar
कुठल्याही जगप्रसिद्ध गोष्टीवर मीम्स तयार करणे याचा सर्वसामान्य बाब आहे. रोज अशी लाखो करोडो मीम्स तयार होत असतात. नाटू नाटू वर काँग्रेसने तयार केलेले हे मीम अशा लाखो करोडो मीम्स सारखेच असले तरी त्यातली भावना मात्र जगात आणि भारतात नाटू नाटू वर व्यक्त झालेल्या भावनांच्या विपरीत आहे.
लूटो-लूटो pic.twitter.com/6ztby1n3wd — Congress (@INCIndia) March 13, 2023
लूटो-लूटो pic.twitter.com/6ztby1n3wd
— Congress (@INCIndia) March 13, 2023
या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंगचे ऑस्कर पारितोषिक मिळाले आहे. पण काँग्रेसने मात्र त्याची खिल्ली उडवताना मीम्स मध्ये नटांचे फोटो मॉर्फ करून त्यावर मोदी आणि अदानींचे चेहरे चिकटवले आहेत. भारतातल्या आणि जगातल्या व्यक्त झालेल्या भावनांच्या विपरीत काँग्रेसने हे मीम्स बनवल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर त्या पक्षाला घेरले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App