सगळ्या वक्फ मालमत्तांचे राष्ट्रीयकरण करा; कर्नाटक मधल्या आमदाराचे पंतप्रधान कार्यालयाला पत्र!!

वृत्तसंस्था

बेंगलुरु : देशभरातल्या वक्फ सगळ्या मालमत्तांचे राष्ट्रीयकरण करा, अशी मागणी करणारे पत्र कर्नाटक मधले आमदाराने पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे. वक्फ मालमत्तांचे वेगवेगळे विवरणच या आमदाराने पत्रामध्ये सविस्तर दिले आहे. Nationalize all waqf properties

एकतर यूपीए सरकारच्या वक्फ कायद्याने वक्फ बोर्डांना अनियंत्रित अधिकार दिले. त्यामुळे वक्फ बोर्डाने वाटेल तशा मालमत्ता गोळा केल्या. यामध्ये शेतकरी, दीन दलित, आदिवासी यांच्या मालमत्तांना देखील वक्फ बोर्डाने सोडले नाही. त्यामुळे आज वक्फ बोर्ड देशातल्या मालमत्ता धारकांमध्ये सरकार आणि रेल्वेच्या खालोखालचे संस्थान झाले आहे. सबब केंद्र सरकारने वक्फ बोर्डाने गोळा केलेल्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तांचे राष्ट्रीयकरण करावे, अशी मागणी भाजपचे आमदार बसवगौडा पाटील यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून केली आहे.

केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले. परंतु, विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ करून ते संसदेच्या सिलेक्ट कमिटीकडे पाठवायला लावले. पण या सिलेक्ट कमिटीच्या बैठकांमध्ये देखील विरोधक प्रत्येक वेळी गदारोळ करून सुधारणांवर चर्चा करण्याऐवजी त्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे राष्ट्रीयकरण करण्याचा एक पर्याय यानिमित्ताने समोर आला आहे.

Nationalize all waqf properties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात