“द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग”मध्ये भारताच्या नेतृत्वाखाली आठ देशांचा समावेश; अफगाण मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग” हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम केंद्रातल्या मोदी सरकारने सुरू केला असून त्यामध्ये भारताच्या नेतृत्वाखाली आठ देशांच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सुरक्षा सल्लागारांनी सहभाग घेतला आहे. या सुरक्षा संवादाचे नेतृत्व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करत असून यामध्ये रशिया, इराण, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिजस्तान, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तान या देशांचा समावेश आहे. अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर या सर्व देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विचारविनिमय करत आहेत. National Security Advisers/Secretaries of Security Councils of Iran, Kazakhstan, Kyrgyzstan, Russia, Tajikistan, Turkmenistan, Uzbekistan taking part in the dialogue

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी राजवट स्थापन केल्यानंतर निर्माण झालेल्या असुरक्षेविषयी या सर्व देशांनी चिंता व्यक्त करून एकजुटीने नव्या आव्हानाचा मुकाबला करण्याचा निर्धार केला आहे. भारताने घेतलेल्या पुढाकाराला या सर्व देशांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.

या देशांचे वैशिष्ट्य असे की हे सर्व देश पूर्वी सुविधेत महासंघाचे भाग होते परंतु ग्लासस्नोत आणि पेरेस्त्रोइकानंतर हे देश सोविएत युनियन मधून फुटले. पण भारताशी हे सर्व देश जोडलेले राहिलेत. या देशाचे दुसरे वैशिष्ट्य असे की हे मुस्लिम बहुल देश असले तरी कट्टरतावादी नाहीत. त्यामुळे भारताशी सुरक्षेपासून संस्कृतीपर्यंत सर्व विषयांवर त्यांचा उत्तम संवाद असतो. आता अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग”च्या निमित्ताने हे सर्व देश एकत्र आले आहेत आणि नव्या आव्हानाचा एकत्रित मुकाबला करण्याची त्यांनी तयारी दाखविली आहे.

National Security Advisers/Secretaries of Security Councils of Iran, Kazakhstan, Kyrgyzstan, Russia, Tajikistan, Turkmenistan, Uzbekistan taking part in the dialogue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात