राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आणि ऊर्जा स्वयंपूर्णता; २०३५ पर्यंत सर्व प्रमुख बंदरांवर इंधन भरण्याच्या सुविधा

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन भारताला २०४७ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विकसित राष्ट्र बनण्याच्या उद्देशाने, भारत प्रत्येक क्षेत्राशी संबंधित धोरणांची अंमलबजावणी करण्यात गुंतलेला आहे. उर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट हा देखील त्याचाच एक भाग असून याद्वारे नेट झिरोचे लक्ष्य २०७० पर्यंत पूर्ण करायचे आहे. National Green Hydrogen Mission and Energy Self Sufficiency Fueling facilities at all major ports by 2035

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन भारताला २०४७ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. या मोहिमेअंतर्गत भारत वेगाने पावले उचलत आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत, देशातील सर्व प्रमुख बंदरांवर २०३५ पर्यंत ग्रीन हायड्रोजन/अमोनिया बंकर आणि इंधन भरण्याच्या सुविधा असतील. मिशन अंतर्गत या बंदरांवर इंधन भरण्याच्या सुविधा उभारल्या जात आहेत.

२९ एप्रिल रोजी मुंबईत ‘इंडिया कॉलिंग कॉन्फरन्स 2023’ मध्ये बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. दीनदयाळ, पारादीप आणि व्हीओ चिदंबरनार बंदरांवर हायड्रोजन बंकरिंग उभारण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हे एक मोठे लक्ष्य आहे.

National Green Hydrogen Mission and Energy Self Sufficiency Fueling facilities at all major ports by 2035

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात