NCW : मणिपूर मधल्या महिला अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; राज्य सरकारला विचारला जाब!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मणिपूर मधील हिंसाचार आणि महिला अत्याचार या घटनांची केंद्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्या संदर्भात मणिपूर सरकारला पत्र लिहून राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून जाब मागितला आहे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली National Commission for Women takes note of the violence against women in Manipur

मणिपूर तसेच मणिपूरच्या बाहेरून देखील हिंसाचार आणि महिला अत्याचाराबाबत केंद्रीय महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमधले तथ्य तपासून त्या संदर्भात मणिपूरच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांना चार दिवसांच्या आत उत्तर द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत असे रेखा शर्मा यांनी स्पष्ट केले.

ज्या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली गेली, त्या महिला आजही मणिपूर मधल्या कॅम्प मध्ये आहेत. तेथे त्यांना सर्व प्रकारची सुरक्षा, अन्न वस्त्र, निवारा पुरवण्यात यावे याबाबत कोणतीही हयगय करू नये, अशा सूचनाही पोलीस महासंचालकांना दिल्याचे रेखा शर्मा यांनी सांगितले.


मणिपूरमधील घटेनवरून राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांना भाजपाचे प्रत्युत्तर!


मणिपूर विषयी संसदेत चर्चेची सरकारची तयारी, पण…

मणिपूर घटनांविषयी संसदेत सर्व प्रकारच्या चर्चेची केंद्र सरकारची तयारी आहे. पण विरोधक हुल्लडबाजी करून ती चर्चा टाळत आहेत, असा प्रहार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केला.

संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्याच वेळी महाराष्ट्र विधानसभेत विरोधक सभात्याग करत बाहेर पडले. देशात या घटनेविषयी सर्वत्र संताप आहे. बॉलीवूड मधील सेलिब्रिटींनी सरकारला या मुद्द्यावर धारेवर धरले आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका राजनाथ सिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केले. राजनाथसिंह म्हणाले, मणिपूरची घटना निश्चितच अत्यंत गंभीर आणि घृणास्पद आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढणे अत्यंत गैर असल्याचे नमूद करून संपूर्ण देशाची मान खाली गेल्याचे म्हटले आहे. पण त्याचवेळी त्यांनी अपराध्यांना क्षमा केली जाणार नाही. कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असेही आश्वासित केले आहे.

सरकार मणिपूरमधल्या सर्व घटनांविषयी अत्यंत गंभीर पणे चर्चा करायला तयार आहे. संसदेत चर्चा व्हावी हा सरकारचाच आग्रह आहे. पण विरोधात मात्र हुल्लडबाजी करून ही चर्चा टाळत आहेत. सरकारची भूमिका मी स्वतः सर्वपक्षीय बैठकीत देखील स्पष्ट केली होती. तिथे देखील आम्ही मणिपूरच्या घटनेविषयी चर्चा करायला तयारच होतो. लोकसभेत देखील आज मी हीच भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करतो. विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण न करता संशयित चर्चा घडू द्यावी. हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

National Commission for Women takes note of the violence against women in Manipur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात