वृत्तसंस्था
नवी दिल्ली – नाशिकमध्ये एका कथित लँड डीलरवर २१ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. तपास अजून पुढे सुरू आहे, असा खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे.Nashik raids on October 21, unaccounted assets worth Rs 100 crore were found, investigation is still going on; Union Finance Ministry reveals
प्राप्तिकर खात्याने २१ ऑक्टोबरला नाशिकमध्ये रिअल इस्टेटशी आणि जमीन व्यवहारांशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करून छापे घातले होते. त्यावेळी काही रोख रक्कम आणि कागदपत्रे या छाप्यात जप्त करण्यात आली होती.
त्याचा तपास केला असता आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. अजून पुढे तपास सुरू ठेवावा लागणार आहे, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या खुलाशात नमूद केले आहे. या आधी प्राप्तिकर खात्याने पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, जयपूर आदी ७० शहरांमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये एकूण १८४ कोटी रूपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली होती.
Income Tax Department carried out a search & seizure operation on October 21 in the case of a person engaged in the real estate business, primarily operating as a land aggregator in Nashik, Maharashtra: Finance Ministry — ANI (@ANI) October 25, 2021
Income Tax Department carried out a search & seizure operation on October 21 in the case of a person engaged in the real estate business, primarily operating as a land aggregator in Nashik, Maharashtra: Finance Ministry
— ANI (@ANI) October 25, 2021
याचा खुलासा प्राप्तिकर खात्याने अधिकृत पत्रक प्रसिध्दीला देऊन केला होता.असाच खुलासा नाशिकमधल्या छाप्यांबद्दल केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे. नाशिकमधल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आल्याचा हा खुलासा आहे.
So far, an unaccounted income of more than Rs 100 crores has been detected as a result of the search operation. The evidence gathered are being examined and further investigations are in progress: Union Finance Ministry — ANI (@ANI) October 25, 2021
So far, an unaccounted income of more than Rs 100 crores has been detected as a result of the search operation. The evidence gathered are being examined and further investigations are in progress: Union Finance Ministry
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App