पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगार मेळाव्यात केले विधान
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यासाठी देशभरात ४५ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. या नवीन नियुक्त्यांमध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या संख्येत मोठी झेप घेतली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, या ७१ हजार नियुक्त्यांपैकी ११,३५५ म्हणजेच १५.८ टक्के नियुक्त्या एससी ६८६२ म्हणजेच ९.५९ टक्के एसटी प्रवर्गासाठी करण्यात आल्या आहेत.
तरुणांना नियुक्ती पत्र वाटप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना संबोधितही केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील हजारो तरुणांसाठी तुमच्या सर्वांसाठी आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. तुमचे वर्षानुवर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. 2024 सालचे हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नवीन आनंद देणारे आहे. मी तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.
Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतातील तरुणांच्या शक्ती आणि प्रतिभेचा पुरेपूर वापर करणे ही आमच्या सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम आम्ही रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सातत्याने राबवत आहोत. आजही ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने सुमारे 10 लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. हा एक मोठा विक्रम आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App