ना सरकारी तामझाम, ना सार्वजनिक शोक; साधेपणाने मातृदेवतेला अंतिम निरोप!

वृत्तसंस्था

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे शंभराव्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांना अंतिम निरोप देताना पंतप्रधान मोदींनी कटाक्षाने साधेपणा पाळला. मोदींच्या आई हिराबा जसे साधे जीवन जगल्या, तितक्याच साधेपणाने त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. narendra modi mother hiraben passed away

गांधीनगरच्या मुक्तिधाम मध्ये धार्मिक पद्धतीने हिराबा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुत्र म्हणून नरेंद्र मोदी सहभागी झाले. गांधीनगर महापालिकेच्या सर्वसामान्य शव वाहिकेतून कुठलेही पुष्पमंडन न करता हिराबा यांचे पार्थिव मुक्तिधाम मध्ये नेण्यात आले. यावेळी सर्व मोदी कुटुंबीय अंतिम संस्कारात सहभागी झाले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे त्यांच्या समवेत होते. परंतु कोणताही सरकारी तामझाम यावेळी अजिबात नव्हता. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे बंधू यांनी हिराबा यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

हिराबा यांच्या निधनामुळे कोणतेही सरकारी सार्वजनिक कार्यक्रम स्थगित झालेले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नियोजित सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

एरवी छोट्या मोठ्या सार्वजनिक जीवनात काम करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यानंतर जो सार्वजनिक शोक प्रदर्शित करण्यामध्ये अनेक जण आग्रही असतात, त्यापैकी कोणताही सार्वजनिक शोक हिराबा यांच्या निधनानंतर व्यक्त करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकांनी सांत्वन पर संदेश पाठवले आहेत. ते आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु कोणत्याही पद्धतीने सार्वजनिक सुट्टी अथवा कोणतेही सार्वजनिक शोकप्रदर्शन मोदींनी कटाक्षाने टाळले आहे.

किंबहुना आई हिराबा यांच्यावरचे अंतिम संस्कार सरकारी शासकीय इतमामात करणे शक्य असताना त्यांनी ते टाळले आहेत. आपली आई ज्या साध्या पद्धतीने जीवन जगली, त्या साध्या पद्धतीनेच पुत्र नरेंद्र मोदींनी तिला अंतिम निरोप दिला आहे.

 

narendra modi mother hiraben passed away

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात