विशेष प्रतिनिधी
बीड : काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सातत्याने प्रहार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचे वैशिष्ट्य राहिले. परंतु आज बीडच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर आणि अरुण जेटली या आपल्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी भावूक झालेले दिसले. narendra modi live from beed loksabha election 2024
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बीडमध्ये सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
मी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करतो. योगेश्वर देवीला प्रमाण करतो. बीडचे आमचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत हृदयाचे नाते राहिले होते. ते माझ्याशी नेहमी बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत. मला त्यांची खूप आठवण येते.
मित्रांनो, माझं एक दुर्दैवं राहिलंय, तुम्ही मला 2014 मध्ये देशसेवेची जबाबदारी दिली तेव्हा मी देशभरातील गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या सहकाऱ्यांना निवडून दिल्ली घेऊन गेलो होतो, जेणेकरुन आम्ही एकत्रपणे देशाची सेवा करू. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता. पण सत्तेवर आल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये मला माझ्या सहकाऱ्याला गमवावे लागले.
या कार्यकाळात मला माझे अनेक सहकारी गमवावे लागले. गोपीनाथ मुंडे, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर. हे मला आणि आपल्या सगळ्यांना सोडून गेले. तुम्ही कल्पना करु शकता का, माझे मदतीचे मजबूत हात जेव्हा कापले गेले, तेव्हा माझ्या अडचणी किती वाढल्या असतील?? त्यामुळे या सर्व सहकाऱ्यांची मला खूप आठवण येते. गोपीनाथ मुंडे यांच्यासह सगळ्या सहकाऱ्यांची मला खूप मोठी उणीव भासते.
आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपत आहे. यासोबतच “इंडी” आघाडीच्या आशाही संपल्या आहेत. पहिल्या टप्प्यात “इंडी” आघाडी फस्त झाली. दुसऱ्या टप्प्यात उद्ध्वस्त झाली, आणि आज तिसऱ्या टप्प्यात इंडी आघाडीचा कुठे छोटा-मोठा दिवा जळत होता तो सुद्धा विझला आहे.
हा मोदी आहे. मी आपल्याला गॅरंटी देतो, जोपर्यंत मोदी जिवंत आहे, दुनियाची कोणतीही ताकद दलित, वंचित, मागस, ओबीसींचं आरक्षण मागे घेऊ शकत नाही ही मोदीची ताकद आहे. आज कोणतीही राष्ट्रवादी ताकद काँग्रेससोबत उरलेली नाही. अस्सल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अस्सल शिवसेना पक्ष भाजपसोबत आहे, आणि काँग्रेससोबत कोण आहे? नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस, आणि हे करत काय आहेत? ते नकली वचन देत आहेत. नकली व्हिडीओ बनवत आहेत.
काँग्रेसची सवय आहे, न काम करा आणि न काम करुद्या. मी गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान बुलेट ट्रेनचं काम सुरु केलं. काँग्रेसने आधी त्याची थट्टा केली. मग विरोध केला. जोपर्यंत महाविनाश आघाडीचे सरकार राहिले. तोपर्यंत या लोकांनी काम पुढे होऊ दिलं नाही. आता परत त्यांचं सरकार आलं तर बुलेट ट्रेनचं काम ठप्प करुन देणार. एकीकडे भाजप आपल्या वचननाम्यात बुलेट ट्रेनच्या विस्ताराची बात करत आहे, दुसरीकडे काँग्रेस आणि इंडी आघाडी बुलेट ट्रेनचा विरोध करत आहे.
आता तुम्ही मला सांगा 21 व्या शतकाच्या भारताला कोणतं सरकार हवं? देशाला या विकास विरोधी लोकांच्या हातात देऊ शकता का? काँग्रेस जिथे आली आहे त्यांनी स्वप्नांचा भंग केला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्याने ते भोग भोगले आहेत. इंडी आघाडीने कधी इथे दुष्काळाच्या परिस्थितीवर लक्ष दिलं नाही. त्यांनी फक्त फिती कापल्या आणि भ्रष्टाचार केलं. 60 वर्षांपासून मराठवाडा जलग्रीड परियोजना ठप्प पडली होती. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांनी मिळून सिंचन योजनेला मिशन मोडमध्ये पुढे नेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App