पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर आठवड्याच्या आतच ट्रम्पचा मोदींना फोन; जागतिक सामरिक सहकार्यावर चर्चा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर लादीमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर अवघ्या आठवड्या भराच्या आतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक सामरिक सहकार्यावर चर्चा झाली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन विचार आणि पाच डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येऊन गेले. पुतीन यांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य करणे विषयी चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर प्रचंड टेरिफ लादल्यानंतर सुद्धा रशियाने भारताला तेल पुरवठ्यात कुठेही कमी आणणार नसल्याचे आश्वासन दिले. भारताने सुद्धा रशियन येईल खरेदी थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले.

पुतिन यांच्या यशस्वी भारत दौऱ्यामुळे भारत अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन अन्य कुठल्याही देशाशी संबंध कमी अथवा जास्त करणार नसल्याचे दाखवून दिले.

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांवर व्यापक विचारविनिमय झाला. दोन्ही नेत्यांनी टेलिफोनवर भारत अमेरिका सामरिक सहकार्य वाढविण्यावर भर दिला. जागतिक आणि विभागीय राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. भारत आणि अमेरिका यांच्यात थेट व्यापार करार होण्याच्या वाटाघाटी सुरू असून त्यातील प्रगतीचा आढावा सुद्धा दोन्ही नेत्यांनी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भारत अमेरिका संबंधांवर व्यापक चर्चा झाल्याचे सांगितले.

Narendra Modi had a telephone conversation today with Donald J. Trump

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात