Narendra Modi साडेतीन कोटी तरुणांना मिळणार रोजगार, पंतप्रधानांनी जाहीर केली विकसित भारत रोजगार योजना

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान विकसित भारत योजना जाहीर केली आहे. या योजनेतून साडेतीन कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे. Narendra Modi

पंतप्रधान म्हणाले- ‘आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. 15 ऑगस्ट रोजी मी माझ्या देशातील तरुणांसाठी १ लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना सुरू करत आहे. यामुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल.’



यावर्षी दिवाळीत आपल्याला एक मोठी भेट मिळणार आहे. जीएसटी अस्तित्वात येऊन ८ वर्षे झाली आहेत. आम्ही त्याचा आढावा घेतला आहे. आम्ही त्यात सुधारणा करून करप्रणाली सोपी केली आहे. आम्ही पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. आम्ही सामान्य लोकांसाठी कर कमी करू, दैनंदिन वस्तू स्वस्त होतील, लोकांना खूप फायदा होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

देश वासियांना आव्हान करताना पंतप्रधान म्हणाले, आजच्या पिढीनं समृद्ध भारतासाठी पावलं उचलली पाहिजेत. देशाच्या विकासाठी मी तुमच्यासोबत आहे. स्वतंत्र भारतासाठी अनेकांनी बलिदान दिलं. त्या पिढीनं बलिदान दिलम आताच्या पिढीनं समृद्ध भारत करावा. देशातील तरुणांमुळे आपण आता खेळणी निर्यात करतोय… आत्मनिर्भर होण्यासाठी आपण अधिक चांगलं काम करू. नव- नवे शोध करुया आणि आपली गरज आपण स्वतःच पूर्ण करू. तुमच्या कल्पना घेऊन या, मी तुमच्यासोबत उभा राहीन.

आपण न्यूक्लिअर क्षेत्रात प्रगती करत आहोत. 10 नवीन अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे. आपण अणुऊर्जेची क्षमता १० पट वाढवू. या क्षेत्रात खाजगी क्षेत्रासाठी मार्ग मोकळा झाला आहे.आता मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येतील. आणखी चार सेमीकंडक्टर योजनांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. परंतु या वर्षाच्या अखेरीस, भारतात बनवलेल्या, भारतातील लोकांनी बनवलेल्या, सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील… असं देखली मोदी म्हणाले… ऊर्जे क्षेत्रात, सर्वांना माहिती आहे की आपण उर्जेसाठी अनेक देशांवर अवलंबून आहोत. पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी आपल्याला लाखो आणि कोटी रुपये खर्च करावे लागतात. आपल्याला या संकटातून देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Narendra Modi announces Developed India Employment Scheme

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात