विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्ष लशींच्या किमतीवरून गोंधळ निर्माण करीत आहेत, असा आरोप भाजपचे नेते व केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.Naqui targets opposition leaders
नकवी यांनी सांगितले की, कोरोनाबाबत भीती आणि गोंधळ निर्माण करण्यापेक्षा तुम्ही समस्येच्या पर्यायाचे घटक बनले पाहिजे. सारे जग कठीण प्रसंगाला सामोरे जात असताना भगवान महावीर यांची तत्त्वे आणि शिकवण उपयुक्त ठरेल. जगा आणि जगू द्या या त्यांच्या संदेशाची संपूर्ण मानवजातीला गरज आहे.
केंद्र सरकार उत्पादकांकडून १५० रुपये दराने डोस घेऊन राज्यांना मोफत पुरवीत आहे. शमशान आणि कब्रीस्तानच्या हॉरर शोमधून आपण बाहेर पडायला हवे. जनतेच्या मनात विश्वास आणि श्रद्धा निर्माण होण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App