विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : दशामातेची मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी रंगांच्या व इतर वस्तूच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, लहान मोठ्या मूर्तींचे दर स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.Nandurbar Is Ready for Dashamata festival; Dashamata idols Are In the final stages of work
दशामातेच्या उत्सव हा मूळचा गुजरात राज्यातील आहे. नंदुरबार जिल्हा सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. येत्या ८ ऑगस्टला मातेची स्थापना करण्यात येत आहे. त्यामुळे कारागिरांनी मुर्ती तयार करण्याच्या कामाला वेग दिला आहे.
शहरात तीन ते चार कारागिरांकडून मुर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. कारागिर परेश सोनार व सागर सोनार यांनी गेल्या ६ महिन्यापासून मूर्ती बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्याकडे एक फुटापासून ते साडेफुटापर्यंत मूर्ती आहेत. अगदी १००रुपयांपासन ते ५ हजार रुपयांपर्यंत मूर्तीची किंमत आहे.
परंतु कोरोनाचे सावट असल्याने ग्राहकांकडून मागणी मंदावलेली आहे. गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मुर्ती खरेदीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु दोन वर्षापासून तेथील भाविक येत नसल्याने ५० टक्के बुकिंग झाले आहे, असे मूर्तिकार सागर सोनार यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App