NAMO NAMO : नरेंद्र मोदी ५ नोव्हेंबरला केदारनाथला देणार भेट ; श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ धामच्या यात्रेवर जाणार आहेत. केदारनाथ धाम येथे पूजअर्चन काल्यानंतर ते श्री शंकराचार्य समाधीचे उद्घाटन तसेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील.NAMO NAMO! Narendra Modi to visit on November 5; A statue of Shri Shankaracharya will be unveiled


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ धामच्या यात्रेवर जाणार आहेत. केदारनाथ धाम येथे पूजाअर्चना केल्यानंतर ते श्री शंकराचार्य समाधीचे तसेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. याबरोबरच ते वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

मोदींच्या केदारनाथ यात्रेशी संत, महंत जोडले जाणार

तर दुसरीकडे मोदी यांच्या केदारनाथ धाम यात्रेच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यज जगतप्रकाश नड्डा यांनी 5 नोव्हेंबर रोजी देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या केदारनाथ धाम भेटीच्या कार्यक्रमात देशभरातील भाजप वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी तसेच मंत्रीदेखील सामील होतील. तसेच देशातील सर्व ज्योतिर्लिंग, चार धाम तसे प्रमुख शिवायलय मंदिरातील संतदेखील मोदी यांच्या केदारनाथ धाम यात्रेशी जोडले जाणार आहेत.



7 मंदिरांमधील संत, महामंडलेश्वर, आचार्यदेखील सहभागी होणार

देशाचा सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी आणि तमाम देशवासीयांना त्याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख 87 मंदिरांमधील संत, महामंडलेश्वर, आचार्यदेखील सहभागी होणार आहेत. मोदी यांच्या केदारनाथ धाम यात्रेदरम्यान संत मेळावे आणि देशाच्या अध्यात्मिक चैतन्याला नवा आयाम देणारे कार्यक्रम असतील.

शंकराचार्यांनी आध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी काम केले

आदिगुरू शंकराचार्यांनी देशातील अध्यात्मिक मूल्ये आणि आध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी अभूतपूर्व काम केले. त्यांनी सांगितलेली तत्त्वे जिवंत ठेवण्यासाठी तसेच केलेल्या अभूतपूर्व कार्याची देशवासीयांना ओळख करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोदी यांच्या केदारनाथ धाम यात्रेचे आयोजन केले आहे.

मोदींची यात्रा पाहण्याची शिवालयात व्यवस्था

मोदी यांच्याा या यात्रेला देशभरातील हजारो शिवालयात पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवालयांत धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये आध्यात्मिक संस्कार होण्यास मदत मिळणार आहे.

दरम्यान, 2013 साली केदारनाथ येथे भीषण पूर आला. या महापुरात श्री केदारनाथ धामची मोठी हानी झाली. त्यानंतर या पवित्र स्थळाच्या संपूर्ण पुनर्बांधणीचे काम नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

NAMO NAMO! Narendra Modi to visit Kedarnath on November 5; A statue of Shri Shankaracharya will be unveiled

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात