Naib Singh Saini : नायब सिंह सैनी यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक!

आरोपीविरुद्ध आयटी ॲक्टनुसार धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी

चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, जुलाना येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना कथितपणे “जीवे मारण्याची धमकी” देण्यात आली होती.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अजमेर असे असून तो मूळचा जिंद जिल्ह्यातील देवरार गावचा रहिवासी आहे. जिंदचे पोलिस अधीक्षक सुमित कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, अजमेरने 8 ऑक्टोबर रोजी राज्यातील मतमोजणीच्या दिवशी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सुमित कुमार म्हणाले, “हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास येताच, एफआयआर नोंदवण्यात आला आणि अजमेरला अटक करण्यात आली.” आरोपीविरुद्ध आयटी ॲक्टनुसार धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमीनुसार, ‘सोंबीर राठी जुलाना हलका’ नावाने बनवलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांनी लिहिले की, जो कोणी हरियाणाचा मुख्यमंत्री होईल, त्याला मी गोळ्या घालीन. गोडसेने ज्या प्रकारे महात्मा गांधींची हत्या केली.’

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या मेवा सिंह यांचा पराभव केला आहे. मेवा सिंह यांनी सुरुवातीला सएम सैनी यांना कडवी टक्कर दिली, पण जसजशी मतमोजणी पुढे सरकली तसतसे सैनी त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेले. सैनी यांना 70,177 मते मिळाली, तर काँग्रेसच्या मेवा सिंह यांना 54,123 मते मिळाली.

Death threat to Naib Singh Saini The accused arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात