विधीमंडळाच्या बैठकीत निर्णय , दुपारी ४ वाजता घेणार शपथ Naib Saini elected as Chief Minister of Haryana by BJP
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : हरियाणात एक मोठी राजकीय बातमी आहे. नायब सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री असतील. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. नायब सैनी यांच्या नावावर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमत झाले आहे. बैठकीनंतर नायब सैनी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांचे पुष्प देऊन अभिनंदन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी साडेअकरा वाजता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी चंदीगडमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली. मनोहर लाल खट्टरच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपाने हरियणामध्येही आपले धक्कातंत्र कायम ठेवले.
हरियाणात वेगवान राजकीय घडामोडी; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!!
कुरुक्षेत्रचे विद्यमान खासदार आणि भाजप अध्यक्ष नायब सिंग सैनी यांच्या नावावर एकमत झाले. नायब सैनी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नायब सैनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत.
विधीमंडळाच्या बैठकीपूर्वी गृहमंत्री अनिल विज संतापाने निघून गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. नायब सैनी यांच्या नावावर त्यांचा आक्षेप होता. विज हे सहा वेळा आमदार असले तरी त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App