कोरोना पीडितांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार काम .
यासह लाखों स्वयंसेवक बजावताय देशभरात सेवा. My service to the people here is my worship! Jai Gurudev! Sri Sri Ravi Shankar’s announcement of ‘Mission Zindagi’; Involvement of celebrities
विशेष प्रतिनिधी
बंगळूरू: आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही संस्था कोरोना पीडितांच्या मदतीसाठीही पुढे आली आहे.गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी कोरोना पीडितांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ‘मिशन जिंदगी’ ची घोषणा केली. कोरोना पीडितांना सर्वतोपरी मदत देणे हा त्यांचा हेतू आहे. हॉस्पिटल अपडेट, ऑक्सिजन बँक, रुग्णवाहिका, कॉल ऑन डॉक्टर, मानसिक व भावनिक आरोग्य, अन्न आणि रोग प्रतिकारशक्ती किट या सर्व सुविधांसह हे अभियान सुरू करण्यात आले .
At this juncture, it is pertinent that all of us come together and extend our hand to help restore the physical health, mental health and vibrancy of our people. Keeping this in view announcing #MissionZindagi. It will provide a platform to those who are in need of help. pic.twitter.com/445dqJGYO8 — Gurudev Sri Sri Ravi Shankar (@SriSri) May 13, 2021
At this juncture, it is pertinent that all of us come together and extend our hand to help restore the physical health, mental health and vibrancy of our people. Keeping this in view announcing #MissionZindagi. It will provide a platform to those who are in need of help. pic.twitter.com/445dqJGYO8
— Gurudev Sri Sri Ravi Shankar (@SriSri) May 13, 2021
आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक यापूर्वीच भारतभरातील अनेक शहरांमध्ये कोविड -19 पासून प्रभावित लोक आणि कुटुंबांना युद्धपातळीवर सेवा देत आहेत.त्यामध्ये रुग्णालयात बेडची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा, भोजन, डॉक्टरांचा समावेश आहे. सल्लामसलत आणि आवश्यक मार्गदर्शन यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व आता देशभरात व्यापक स्तरावर सुरू करण्याचे नियोजन आहे.
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये आता ‘The art of living’ ही संघटना सुद्धा मदतीसाठी पुढे आली आहे. श्री तर या मिशन जिंदगी अंतर्गत अनेक बॉलिवूड कलाकार मदत करण्यासाठी पुढे आलेत.
मिशन जिंदगी सोबत मिळून राजकुमार हिरानी, करण जोहर, महावीर जैन, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कपिल शर्मा, बादशाह, वरदा नाडियाडवाला, वरुण शर्मा आणि अनेक सेलिब्रिटी कोरोना रूग्णांची मदत करत आहेत.
मिशन जिंदगी १७ मेपासून सुरुवात करण्यात आली. या अतंर्गत हॉस्पिटलची माहिती, ऑक्सिजन बँक, रुग्णवाहिका, कॉलवर उपलब्ध होणारे डॉक्टर, मानसिक आरोग्य, फूड आणि इम्यूनिटी किट या सर्व सुविधा देण्यात येत आहेत.
यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यननेही मदतीसाठी पुढाकार घेतला असून ‘लोकांना मदत करण्याची चेन तुटू नये’ असं त्याने म्हटलंय. तर अभिनेत्री तापसी पन्नूने देखील ट्विट करत ‘प्रत्येक लाईफ गरजेची आहे, चला देशातल्या लोकांची मदत करूया’ असं आवाहन केलंय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App