योगगुरू, आयुर्वेदीक औषधांचे निर्माते बाबा रामदेव आणि देशभरातील अँलोपॅथीचे डॉक्टर यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने रामदेवबाबा यांच्या विरोधात कोर्टाची पायरी देखील चढली आहे. दुसरीकडे रामदेव बाबा यांनीही आधुनिक औषध शास्त्राला नेमके प्रश्न विचारून अडचणीत आले. हा वाद शमलेला नसतानाच औषद माफियांविरोधातला लढा चालूच ठेवण्याची गर्जना त्यांनी केली आहे. My fight against drug mafia will continue, Baba Ramdev’s roar
वृत्तसंस्था
हरिद्वार (उत्तराखंड) : देशातले ॲलोपॅथीच्या डॉक्टरांविरोधात माझा संघर्ष नाही. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्यात झगडा निर्माण करण्याचाही माझी इच्छा नाही.
उलट वाद संपावा अशीच माझी इच्छा आहे. या संदर्भात मी ‘मौन योग’ही धारण करेन. पण औषध माफियांविरोधातला माझा संघर्ष थांबणार नाही, अशी गर्जना बाबा रामदेव यांनी केला आहे.
औषध माफीयांच्या विरोधात मी आवाज उठवत असल्याने माझ्याविरोधात या सगळ्यांनी आघाडी उघडली आहे. मात्र कोणाच्या दबावामुळे माझा संघर्ष थांबणार नाही. कारण यातच 130 कोटी भारतीयांचे हित आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला.
ॲलोपॅथी, या क्षेत्रातले डॉक्टर यांच्याशी आपला वाद नाही. त्यांच्या कार्याचा आपण आदर करतो, असे बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना आक्षेपार्ह वाटणारी माझी वक्तव्येसुद्धा मी यापुर्वीच विनाअट मागे घेतली आहेत.
त्यावर खेदही व्यक्त केला. तरीही काहींना आपत्ती असेल तर मी यावर ‘मौन योग’ करेन असे रामदेव यांनी स्पष्ट केले.औषध माफियांविरोधात आवाज उठवल्याने माझा व्यवसाय बंद पाडण्याच्यामागे ते लागले आहेत.
पण पतंजलीची उत्पादने खरेदी करण्यासाठी मी कोणावरच दबाव आणत नाही. उलट आयुर्वेदातले घरगुती उपचार सांगतो ज्यामुळे लोक घरच्या घरी स्वतःला निरोगी ठेवू शकतील. माझ्या व्यवसायातून मिळणारा पैसा मी लोकांसाठीच परमार्थासाठी खर्च करतो. त्यामुळे योगासोबत मी बिझनेस गुरू असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.
जे औषध माफिया दोन रुपयांचे औषध दोन हजार रुपयांना विकतात त्यांच्या विरोधात माझा लढा असल्याचे रामदेव म्हणतात. औषध कंपन्यांच्या याच नफेखोरीमुळे ॲलोपॅथी उपचार सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाहीत.
संपूर्ण आरोग्य व्यवस्था या औषध कंपन्यांच्या तालावर चालते. हेच औषध माफिया लोक औषध आणि इतर वैद्यकीय साहित्याच्या किमती ठरवतात. बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या खेळात सहभागी असतात,
अशी टीका रामदेव यांनी केली. दरम्यान बिहारमधील मुजफ्फरपूर येथील ग्यान प्रकाश यांनी बाबा रामदेव यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. येत्या सात जुनला यावर सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App