विशेष प्रतिनिधी
भागलपूर : वसतिगृह अधिक्षकांनी बुरखासक्तीचा तालीबानी नियम काढल्याने भागलपूरमधील विद्यार्थिनींनी एल्गार पुकारला आहे. बुरख्याच्या सक्तीविरोधात विद्यार्थिनीनींनी आंदोलन करत वसतिगृहावर दगडफेकही केली.Muslim students in Bhagalpur protest against Taliban Sharia rules for forcing burqa
भागलपूर येथील मुस्लिम विद्यार्थिनींच्या वसतिगृहात अधीक्षकांनी बुरखा घालण्याची सक्ती केली. याविरोधात संतप्त झालेल्या मुलींनी वसतिगृहावर दगडफेक केली.विद्यार्थींनींनी सांगितले की, बिहारमध्ये उन्हाळ्यात प्रचंड उकाडा आणि दमट हवामान असते.
त्यामुळे या काळात बुरखा घालणे शक्य नसते. त्यावेळी आम्ही पायघोळ अंगरखा घालतो. मात्र, त्यामुळे अधीक्षक आम्हाला शिवीगाळ करतात. आम्ही मुलांशी गप्पा मारतो अशी चुकीची माहिती आमच्या पालकांना देतात.
आम्ही वसतिगृहात अनेक वेळा टीशर्ट आणि ट्राऊझर्स घालतो. त्यामुळे आम्ही निर्लज्ज झालो का? वसतिगृहाच्या अधीक्षका आमच्यावर असे आरोप करतात.या प्रकारामुळे तणाव निर्माण झाल्याने नाथ नगरच्या मंडल अधिकारी स्मिता झा यांनी पोलीस पथकासह मुलींची वसतिगृह गाठून घटनेची माहिती घेतली आणि विद्यार्थिनींची समजूत काढली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App