विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रमजानचा महिना चालू असताना दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया गांधी, जया बच्चन, अखिलेश यांची “रिझर्व्ह” टेबलवर दिसली घट्ट मैत्री!!Muslim League Iftar party held in Delhi Sonia Jaya Bachchan Akhilesh close friendship was seen at the reserved table!!
त्याचे झाले असे :
इंडियन नॅशनल मुस्लिम लीगने आज राजधानी नवी दिल्ली इफ्तार पार्टी दिली. मुस्लिम लीगने मागितलेले पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर देखील त्या पक्षाचे भारतात अस्तित्व उरलेच. ते केरळमध्ये वाढत गेले. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर मुस्लिम लीगने इंडियन नॅशनल मुस्लिम लीग असे नवे नाव धारण केले. त्या पक्षाचे वर्षानुवर्षे केरळमधून खासदार आणि आमदार निवडून आले.
त्याच इंडियन नॅशनल मुस्लिम लीगने आज इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत पाहुण्यांच्या काही टेबल मुद्दामून रिझर्व्ह ठेवली होती. त्यातल्या स्पेशल रिझर्व्ह टेबलावर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी एकाच गप्पा मारत वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले.
#WATCH | Delhi | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi, Samajwadi Party chief Akhilesh Yadav, Samajwadi Party MP Jaya Bachchan attend an Iftar hosted by Indian Union Muslim League (IUML). pic.twitter.com/GToGidpeet — ANI (@ANI) March 20, 2025
#WATCH | Delhi | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi, Samajwadi Party chief Akhilesh Yadav, Samajwadi Party MP Jaya Bachchan attend an Iftar hosted by Indian Union Muslim League (IUML). pic.twitter.com/GToGidpeet
— ANI (@ANI) March 20, 2025
एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती करणारे केरळ मधले काँग्रेसचे खासदार शशी थरूर या पार्टीत सामील झाले होते. त्यांनी इंडियन नॅशनल मुस्लिम लीगचे राजकीय महत्त्व अधोरेखित करून सांगितले. इंडियन नॅशनल मुस्लिम लीगचे केरळमध्ये मोठे संघटन आहे. काँग्रेस बरोबर त्या पक्षाची युती आहे. त्या पक्षाचे अनेक खासदार आणि राज्यसभेत निवडून आलेत. आम्ही सगळेजण मुस्लिम लीगच्या नेत्यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा द्यायला इफ्तार पार्टीला आलो आहोत, असे शशी थरूर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App