दुर्गापूजा विसर्जनात बांगलादेशात हिंदूंची हत्या; बांगलादेशाच्या डेप्युटी हाय कमिशरनेटसमोर कोलकात्यात इस्कॉनचे भजन

वृत्तसंस्था

कोलकाता – बांगलादेशात दुर्गापूजा विसर्जनात धर्मांध जमावाने तीन हिंदूंची हत्या केली. त्याचा जगभरातून तीव्र निषेध होत असताना इस्कॉन मंदिरांच्या प्रतिनिधींनी आज सायंकाळी कोलकात्यात बांगलादेशाच्या हाय कमिशरनेटसमोर भजन करून तिथल्या सरकारचा निषेध केला.Murder of Hindus in Bangladesh during Durga Puja immersion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याशी थेट बोलून बांगलादेशातील हिंदू समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा इस्क़ॉनने व्यक्त केली आहे.

बांगलादेशात दुर्गापूजा विसर्जनाच्या दिवशी धर्मांध जमावाने तीन हिंदूंची निर्घृण हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नौखालीत दुर्गापूजा मंडपाचा विध्वंस केला. याचा निषेध जगभरातून करण्यात आला. बांगलादेशाच्या शेख हसीना वाजेद सरकारने या हिंसाचाराला दोषी असणाऱ्यांना शिक्षा देण्याची घोषणा देखील केली. पण अद्याप अटकेची कायदेशीर कारवाई झालेली नाही.

याचा निषेध म्हणून कोलकात्यातील इस्कॉन मंदिराच्या प्रतिनिधींनी आणि हिंदू समाजाने एकत्र येऊन कोलकात्याच्या डेप्युटी हाय कमिशरनेटपुढे भजन आंदोलन केले. त्यामध्ये हजारो हिंदू मेणबत्या घेऊन सहभागी झाले होते.

Murder of Hindus in Bangladesh during Durga Puja immersion

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात