मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाकरे – पवार सरकारवर खोचक टिपण्णी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवीन सरकार आले. त्यामुळे केंद्रात आणि महाराष्ट्रातले डबल इंजिन सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी गतिशील काम करत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केले. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रात आपले सरकार असा डबल इंजिनचा उल्लेख करून मोदींनी आधीच्या अडीच वर्षातल्या ठाकरे – पवार सरकारवर खोचक टिपण्णी केली. Mumbai’s development accelerated by the double engine government

देशात एका बाजूला घर, शौचालय, वीज, पाणी, गॅस, मोफत आरोग्य, एम्स, आयआयटी वाढत आहेत, तर दुसरीकडे आधुनिक कनेक्टीव्हीटीवरही जोर दिला जात आहे. देशातील आजची गरज आणि भविष्यातील गरज या दोन्ही आघाडींवर काम सुरु आहे. जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, पण भारतात अजूनही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देऊन त्यांची चूल विझू देत नाही.

विकसित भारताच्या निर्मितीसाठी शहराची भूमिका महत्वाची आहे. त्यात येणाऱ्या २५ वर्षात महाराष्ट्रातील अनेक शहरे देशाच्या विकासाला गती देणार आहेत. त्यासाठी मुंबईला तसे तयार करण्याचे प्राधान्य डबल इंजिन सरकारचे आहे. २०११ पर्यंत केवळ ११ किमी मेट्रो सुरु होती पण डबल इंजिन सरकार येताच मेट्रोचे काम आणखी जोरात सुरु आहे. ३०० किमी पर्यंत मेट्रोचे जाळे पसरत आहे, मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबईच्या विकासासाठीच्या ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे शिलान्यास आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. बीकेसी येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

आधुनिक कनेक्टिव्हीटी मुंबईतील कायाकल्प करणार

डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकांनाही आधुनिक सुविधा देत आहे, हे साधन संपन्न नागरिकांनाच मिळत होते, म्हणून रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा होता आहे. सीएसएमटी इथे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिले जाणार आहे. शहरात मल्टी मॉडल कनेक्टिव्हीटी विकसित केली जात आहे. आधुनिक कनेक्टिव्हीटी मुंबईतील कायाकल्प करणार आहे. कोस्टल रोड, इंदू मिल स्मारक, ट्रान्स हार्बर लिंक हे सर्व प्रकल्प मुंबईला वेगळी ताकद देणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प रुळावर आला आहे.

मुंबईचे रस्ते सुधारण्याच्या कामाचे श्रेय डबल इंजिन सरकारला जाते. प्रदूषण आणि स्वच्छता याला प्राधान्य दिले जात आहे. बायो इंधन लवकर आणले जाणार आहे. शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ्य आणि राजकीय इचछाशक्तीची कमतरता नाही. फेरीवाल्यांनी ५० हजार कोटींचे व्यवहार केले आहेत. हे फेरीवाले डिजिटल व्यवहार कसे करणार असे हिणवले जात होते, त्यांना हे मोठे उत्तर आहे. त्यांनी १० पावले पुढे चालावे मी 11 पावले चालून पुढे येइन. जेवढे तुम्ही डिजिटल व्यवहार कराल, तेव्हा तुम्हाला स्वनिधी अंतर्गत मिळालेल्या कर्जावर व्याज भरायची वेळ येणार नाही. तुमच्या उज्जवल भविष्यासाठी आश्वासन देण्यासाठी मी मुंबईत आलो आहे, असेही असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Mumbai’s development accelerated by the double engine government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात