एनआयए टीम त्याला अमेरिकेतून दिल्लीला घेऊन आली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Tahawwur Rana देशाची आर्थिक राजधानी मुंबईला दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून टाकणारा दहशतवादी तहव्वुर राणा याला घेऊन एनआयएचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. एजन्सीने त्याला अमेरिकेतून भारतात आणले आहे.Tahawwur Rana
तहव्वुर राणाला अमेरिकेहून आणणारे चार्टर्ड विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल विमानतळावर उतरवण्यात आले. तेथून त्याला बुलेटप्रूफ वाहनातून एनआयए कार्यालयात नेले गेले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची याचिका फेटाळून लावली होती, ज्यामध्ये त्याने प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
६४ वर्षीय तहव्वुर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. तो लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये तुरुंगात होता. राणाने २७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या असोसिएट जस्टिस एलेना कागन यांच्यासमोर याचिका दाखल केली होती. यामध्ये त्याने “हेबियस कॉर्पस याचिकेच्या सुनावणीपर्यंत प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची” मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App