जाणून घ्या, अमेरिकन न्यायालयात नेमकं काय म्हणाला आहे?
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : Tahawwur Hussain Rana
२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, पाकिस्तानी वंशाचा दहशतवादी आणि कॅनेडियन नागरिक तहव्वुर हुसेन राणा याला भारतात प्रत्यार्पणाची भीती वाटत आहे. त्याने आपल्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी अमेरिकन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानी वंशाच्या दहशतवाद्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की, विविध कारणांमुळे तो भारतात टिकू शकणार नाही. म्हणून, त्याचे प्रत्यार्पण ताबडतोब थांबवले पाहिजे, कारण जर ते थांबवले नाही तर तेथे (भारतात) त्याच्या खटल्याचा पुनर्विचार होणार नाही, अमेरिका देखील आपले अधिकार क्षेत्र गमावेल आणि नंतर त्याला लवकरच मारले जाईल.
२००८ च्या मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्या तहव्वूर राणाने याचिकेतून सांगितले की, जर त्याचे भारतात प्रत्यार्पण केले गेले तर पाकिस्तानी मुस्लिम असल्याने त्याला छळले जाण्याची दाट शक्यता आहे. कारण तो मुस्लिम धर्माचा आहे आणि पाकिस्तानी वंशाचा आहे. शिवाय तो पाकिस्तानी सैन्याचा सदस्यही राहिला आहे व त्याच्यावर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोप आहे.
त्याच्या वकिलाकडून असेही म्हटले गेले आहे की, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत, जर त्याला भारतात पाठवले तर त्याचा खूप छळ होण्याची शक्यता आहे. तर त्याने न्यायालयात दाखल केलेल्या अपीलात असेही म्हटले आहे की जर तो भारतात गेला तर त्याला एखाद्या तत्काळ आदेशाने मारले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App