वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.
नवी मुंबई विमानतळ होणार पर्याय
टर्मिनल 1 बंद असताना सुमारे १० दशलक्ष (१ कोटी) प्रवासी नवी मुंबईतील नव्याने तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळतील. उर्वरित काही विमानसेवा मुंबईच्या टर्मिनल 2 वर हलवण्यात येतील.
नवीन टर्मिनल 1 कधी होईल तयार?
टर्मिनल 1 चे नूतनीकरण टप्प्याटप्प्याने केले जाईल आणि हे काम २०२९-३० पर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. नवे टर्मिनल पूर्ण झाल्यावर त्याची प्रवासी हाताळण्याची क्षमता २० दशलक्ष (२ कोटी) वार्षिक इतकी असेल. सध्या ही क्षमता कमी आहे, त्यामुळे वाढत्या प्रवाशांचा भार पेलण्यासाठी हे मोठं नूतनीकरण होत आहे.
नवी मुंबई विमानतळाची तयारी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला तिथून दररोज सुमारे ६० विमानं उड्डाण करतील आणि नंतर ही संख्या हळूहळू वाढत जाईल. येत्या काही वर्षांत हे विमानतळ देशातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक ठरणार आहे.
मुंबईतील टर्मिनल 1 पुढील वर्षीपासून काही काळासाठी बंद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नवी मुंबईकडे वळावं लागणार आहे. हे बदल मुंबईच्या विमानवाहतुकीत मोठा फरक घडवणार असून नवीन सुविधांसह एक आधुनिक विमानतळ निर्माण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App