मुलायम सिंह यादव : समाजवादी सुरवात, कारसेवकांवर गोळीबार, सोनियांना राजकीय फाऊल ते मोदींना शुभेच्छा!! एका राजकीय प्रवासाचा अंत!!

विशेष प्रतिनिधी

मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतून सुरुवात, उत्तर प्रदेशात अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार, सोनिया गांधींना राजकीय फाऊल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा!! अशा एका राजकीय प्रवासाचा अंत झाला आहे. Mulayam Singh Yadav : from socialist to supporter of PM Narendra Modi, a political biography

मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवासाची सुरवात राम मनोहर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली समाजवादी चळवळीतून आणि काँग्रेस विरोधातून झाली आणि त्या प्रवासाने अनेक वळणे – वळसे घेत त्याची अखेर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हणजे काँग्रेसच्या विरोधातच झाली आहे!!

 काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला

मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवास उत्तर प्रदेश आणि देशाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा घटक राहिला होता. 1990 च्या दशकात काँग्रेसच्या अंताची सुरुवात आणि भाजपच्या यशाची सुरुवात या राजकीय संधिकाला मध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये मुलायम सिंह यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला वाटा उचलला होता. राजीव गांधी यांची लोकप्रियता 1989 मध्ये ओसरून काँग्रेसने बहुमत गमावले. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या बालेकिल्ला ढासळायला तेव्हाच सुरुवात झाली. तो ढासळण्यामध्ये मुलायम सिंह यादव आणि काशीराम यांचा सिंहाचा वाटा होता. काँग्रेसच्या राजवटीचा सूर्य उत्तर प्रदेशातून कधी ढळणारच नाही, असे वाटत असताना मुलायम सिंह यादव, काशीराम आणि त्यांच्या राजकीय शिष्या मायावती एकत्र आले आणि 1990 च्या दशकातच त्यांनी राज्याच्या राजकारणात काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाला यशस्वी पर्याय उभा करून दाखवला. सरकार बनवून दाखवले, इतकेच नाही तर काँग्रेसचा पाया पूर्ण उखडून उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यातून त्या पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी मोठी राजकीय पायाभरणी केली. ही मुलायम सिंह यादव यांच्या राजकीय कारकीर्द मोठी कामगिरी ठरली.

 

राजकीय कारकिर्दीवरील काळा डाग

1990 मध्येच मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री असताना अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश त्यांनी दिला आणि त्यामध्ये रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे दोन बंधू श्री राम जन्मभूमी आंदोलनात शहीद झाले. मुलायम सिंह यादव यांच्या राजकीय कारकीर्दीवरचा हा सर्वात मोठा काळा डाग ठरला. त्यानंतर मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जरूर बनले, परंतु राजकीय कारकिर्दीवरचा काळा डाग ते कधीच पुसू शकले नाहीत. त्या काळात त्यांची संभावना “मुल्ला मुलायम” अशी झाली आणि काँग्रेस पेक्षाही अधिक खालच्या पातळीवर जाऊन मुस्लिम तुष्टीकरण करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा बनली. ही प्रतिमा समाजवादी पक्षासाठी घातक ठरून 1995 मध्ये समाजवादी पक्षाची सत्ता उत्तर प्रदेशातून उखडली गेली. भाजप सारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला खऱ्या अर्थाने पायरोवा करण्याची संधी मुलायम सिंह यादव यांच्याच कारकीर्दीत मिळाली होती.

मुलायम सिंह यादव यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच काँग्रेस विरोधातला राहिला. कारण काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या दोन्हींचे राजकीय पाये धर्मनिरपेक्ष राजकारणात होते. त्यामुळे त्यांचा संघर्ष अपरिहार्य होता. उत्तर प्रदेशात काँग्रेस जोपर्यंत मजबूत होती तोपर्यंत मुलायम सिंह यादव यांचे नेतृत्व त्या राज्यात स्थिरावणे शक्य नव्हते. ते मुलायम सिंह यादव यांनी काँग्रेसच्या पाया उखडण्यासाठी काशीराम यांच्याशी हात मिळवणे करून शक्य केले. काँग्रेसला उत्तर प्रदेशात पुन्हा आपला राजकीय पाया मजबूत करण्याची संधी कधीच मिळू नये यासाठी त्यांनी प्रसंगी आतून भाजप सारख्या पक्षाशी देखील संधान बांधले, पण काँग्रेसला पुन्हा तशी संधी कधी मिळू दिले नाही.

सोनिया गांधींना पाठिंब्याचे पत्र नाही

1999 मध्ये एका मताने वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनण्याची संधी आली असताना ऐनवेळी मुलायम सिंह यादव यांनी त्यांना राष्ट्रपतींना देण्याचे पाठिंब्याचे पत्र द्यायला नकार दिला. हा सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदातला निर्णायक नकार ठरला. त्या कधीही पंतप्रधान बनू शकल्या नाहीत 2004 मध्ये देखील सोनिया गांधींच्या आतल्या आवाजामागे 1999 चा धसका कारणीभूत असल्याचे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ठाम समजूत आहे आणि त्यामध्ये तथ्यांश आहे.

सोनियांशेजारी उभे राहून मोदींना पाठिंबा

मुलायम सिंह यादव यांच्या राजकीय कारकिर्दीचे अखेर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करण्यात गेली आहे. 2014 ते 2019 या कारकिर्दीत कालावधीत मुलायम सिंह यादव लोकसभेचे सदस्य होते. 2019 च्या निवडणुकीपूर्वी शेवटच्या निरोपाच्या अधिवेशनात मुलायम सिंह यादव यांनी उघडपणे सर्व संसद सदस्यांना पुन्हा निवडून येण्याचे शुभेच्छा देताना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील आपण पुन्हा निवडून यावे आणि पुन्हा पंतप्रधान बनावे, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचे ते भाषण त्यांनी सोनिया गांधी यांच्या शेजारी उभे राहून केले होते. त्या वेळच्या व्हिडिओ क्लिप आजही युट्युब वर उपलब्ध आहेत आणि ते भाषण त्यावेळी गाजले होते. पंतप्रधान मोदींनी देखील त्या भाषणातले राजकीय इंगित ओळखून मुलायम सिंह यादव यांना हात जोडून अभिवादन केले होते.

मुलायम सिंह यादव यांची राजकीय कारकीर्द समाजवादी चळवळीतून सुरू होऊन कार्यसेवकांच्या हत्येपर्यंत गेली पण तेथून पुन्हा वळण घेऊन काँग्रेस विरोध कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पाठिंबा देण्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि आज 10 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या निधनाने ही कारकीर्द संपुष्टात आली आहे.

Mulayam Singh Yadav : from socialist to supporter of PM Narendra Modi, a political biography

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub