प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी मुघलांची तरफदारी करून भारतातले 20 कोटी मुसलमान घाबरणार नाहीत. तर लढतील, असा दावा केला आहे. नसरुद्दीन शहा यांनी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक परस्पर विसंगत दावेही केले आहेत.Mughal support from Nasruddin Shah; Language for 20 crore Muslims to fight !!
एकीकडे मुसलमानांना घाबरवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले तर दुसरीकडे मुसलमान घाबरणार नाहीत लढतील, असाही दावा त्यांनी केला आहे. मुघलांना आक्रमक म्हणण्यापेक्षा ते इथे स्वतःची मातृभूमी शोधण्याकरता आले. इथे शरणार्थी होते. यांनी भारताच्या कला संस्कृती साहित्य यामध्ये भर घातली, अशी मुक्ताफळे देखील नसरुद्दीन शहा यांनी उघड उधळली आहेत.
नसरुद्दीन शहा यांच्या मुलाखतीनंतर नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून मोगलांना पूर्वी भारतामध्ये साहित्य कला संस्कृती वास्तुशास्त्र वगैरे काही नव्हतेच का?, असे तिखट सवाल अनेकांनी नसरुद्दीन शहा यांना केले आहेत. मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते याचे कारण ते स्वतःच आहेत. त्यांना कोणी घाबरवत नाही ते धमक्या देऊन धर्मांध भाषा वापरूनच येथे राहतात, असे टीकास्त्र देखील अनेकांनी सोडले आहे.
नसरुद्दीन शहा हे स्वतःला लिबरल विचारवंत समजतात परंतु मुघलांची तरफदारी करून त्यांनी आपले नियत साफ नसल्याचे दाखवून दिल्याची टीकाही अनेकांनी केली आहे. नसरुद्दीन शहा यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंङ होत असून त्याच्यावर अनेकांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परंतु त्यापलिकडे जाऊन मुघलांची तरफदारी करणे यामुळे सोशल मीडियावर नसरुद्दीन शहा जोरदार ट्रोल होताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App