मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले Mother of minor accused in Pune Porsche accident case also arrested
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी कारवाई करत गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक केली असून आज तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिने आपल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाडच केली नाही तर बदलही केली होती.
ही बातमी समोर येताच शिवानी अगरवला अंडरग्राउंड झाली. अखेर पुणे पोलिसांना त्याचा शोध लागला आहे. काल रात्री ती मुंबईहून पुण्यात आली, अटकेची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल.
या प्रकरणी ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे.आरोपीच्या वडिलांवरही रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासात आता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाच्या रक्ताचा नमुना त्याच्या आईच्या रक्ताच्या नमुन्यास बदलल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App