विशेष प्रतिनिधी
पाटणा : Prashant Kishor, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयामुळे विरोधी पक्षांमध्ये गोंधळ उडाला आहे. आरजेडीच्या पराभवामुळे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी एनडीएवर मत खरेदीचा आरोप केला. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी सांगितले की, जर सरकारने निवडणुकीपूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६०,००० हून अधिक लाभार्थींना प्रत्येकी १०-१० हजार रुपये वाटले नसते तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या जागा २५ पेक्षा कमी झाल्या असत्या. त्यांनी असे सुचवले की एनडीएने निवडणूक जिंकली नाही, तर मते विकत घेतली.Prashant Kishor,
लालू-राबडी छळाची चौकशी व्हावी : तेजप्रताप
बहीण रोहिणी आचार्य यांच्या समर्थनार्थ आवाज उठवणारे तेजप्रताप यादव यांनी आवाहन केले की, त्यांच्या आई-वडिलांना(लालू-राबडी) मानसिक छळ सहन करावा लागला आहे का याची चौकशी केली जावी. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि बिहार सरकारकडे या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
सरकार स्थापनेवर भाजप-जेडीयू नेत्यांची बैठक
जेडीयू नेते संजय झा आणि ललन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित होते. ही बैठक सुमारे तीन तास चालली. सूत्रांनुसार, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापनेच्या तयारीवर चर्चा झाली, ज्यामध्ये मंत्रिपदांचे वाटप आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवाराची निवड यांचा समावेश आहे. बुधवारी भाजपची बैठक होणार आहे.
तेजस्वी भावुक, म्हणाले- पक्षाकडे की कुटुंबाकडे पाहू
राजद विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तेजस्वी यादव आमदारांना म्हणाले, विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. ते म्हणाले, कुटुंबावर लक्ष केंद्रित करावे की पक्षावर. यावर वडील लालूप्रसाद यादव यांनी हस्तक्षेप करत पक्षनेतृ़त्व करण्यास सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App