वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 150 जण नदीत पडले आहेत. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरवीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 150 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 150 जण उपस्थित होते त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली आहे.
या पुलावर 500 जण असल्याची माहिती समोर आली होती. प्रत्यक्षात पुलावर 150 जण उपस्थित असल्याची माहिती गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते. या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजण पडले आहे.
पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती सुरवातीला समजू शकली नव्हती. परंतु पुलावर 150 जण असल्याची माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिल्यानंतर आकड्यांमध्ये स्पष्टता आली आहे.
या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत पोलीस अग्निशमन दलाचे कर्मचारी करीत आहेत.
गुजरात के मोरबी में केबल ब्रिज गिरने से अब तक मरने वालों की संख्या 35 हुई: गुजरात मंत्री बृजेश मेरजा pic.twitter.com/CR8tIFi3oL — ANI_HindiNews (@AHindinews) October 30, 2022
गुजरात के मोरबी में केबल ब्रिज गिरने से अब तक मरने वालों की संख्या 35 हुई: गुजरात मंत्री बृजेश मेरजा pic.twitter.com/CR8tIFi3oL
— ANI_HindiNews (@AHindinews) October 30, 2022
ये बेहद दुखद घटना है। आज शाम को मोरबी में करीब 6:30 बजे हैंगिंग ब्रिज टूटा। उस समय 150 लोग वहां मौजूद थे। इस घटना में मात्र 15 मिनट में शहर का पूरा तंत्र घटना स्थल पर पहुंच गया। बचाव कार्य में अभी तक लगभग 70 लोगों को अस्पताल पहुंचाया गया है: गुजरात के गृह मंत्री हर्ष संघवी pic.twitter.com/YnWLGwnpSU — ANI_HindiNews (@AHindinews) October 30, 2022
ये बेहद दुखद घटना है। आज शाम को मोरबी में करीब 6:30 बजे हैंगिंग ब्रिज टूटा। उस समय 150 लोग वहां मौजूद थे। इस घटना में मात्र 15 मिनट में शहर का पूरा तंत्र घटना स्थल पर पहुंच गया। बचाव कार्य में अभी तक लगभग 70 लोगों को अस्पताल पहुंचाया गया है: गुजरात के गृह मंत्री हर्ष संघवी pic.twitter.com/YnWLGwnpSU
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफ च्या टीमला ताबडतोब सूचना देऊन 15 मिनिटात दुर्घटने स्थळापशी हजर राहायला सांगितले. त्यानुसार इंडिया रेटिंग एनडीआरएफची टीम ताबडतोब तिथे पोहोचली
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App