चित्रीकरण करप्रणालीत सवलती मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा केली जाणार असल्याचेही सांगितले Devendra Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी, मुंबई येथे ‘वेव्ह्ज 2025’ मध्ये ‘क्रिएटर्स आणि प्लॅटफॉर्म्स’ विषयावर राऊंड टेबल चर्चा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र वेगाने विस्तारत असून अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे नवोदित आणि स्वतंत्र निर्मात्यांना मनोरंजन क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक डिजिटल रूपात रूपांतर करून त्यांच्या बौद्धिक संपदेचे (IP) निर्माण व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करण्याच्या कल्पनेचे त्यांनी विशेषतः कौतुक केले. Devendra Fadnavis
महाराष्ट्र हे निर्मात्यांसाठी प्रेरक आणि पूरक वातावरण देणारे राज्य असून, चित्रीकरण करप्रणालीत सवलती मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी मराठी कंटेंट, परवाने व कलाकारांबाबत असलेल्या अडचणी मांडल्या. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही देत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक दर्जेदार मराठी कंटेंट उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य वृद्धीसाठी टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. आयपी (बौद्धिक संपदा) विषयक जनजागृतीही महत्त्वाची असून या क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) स्थापन करण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी प्रणाली’ कार्यान्वित आहे. शासकीय ठिकाणी शुटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. बैठकीस राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App