Mood Of The Nation : भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण ? नरेंद्र मोदी आणखी कोण ! वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या वर्षभराच्या कालावधीत तीन सर्व्हे केले आहेत. यात भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? असा प्रश्न विचारला होता .पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, राजीव गांधी यांच्यापैकी कुणाला किती टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे पहा हा रिपोर्ट. Mood Of The Nation: Who is the most popular Prime Minister of India? Who else is Narendra Modi? Read India Today’s survey

भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण?

  • देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 34 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
  • भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 20.3 टक्के लोकांनी सर्वात लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे
  • त्यानंतर इंदिरा गांधी यांना लोकप्रिय म्हणून 10.8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे
  • जवाहरलाल नेहरू यांना 8.8 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे
  • मनमोहन सिंग यांना 6.8 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे
  • लाल बहादुर शास्त्री यांना 5 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे
  • व्ही. पी. सिंग यांच्याबाबत 4.5 टक्के लोकांनी मतं नोंदवत लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे
  • तर 2.6 टक्के लोकांना राजीव गांधी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत असं वाटतं
  • 1.8 टक्के लोकांना पी. व्ही. नरसिंह राव हे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत असं वाटतं
  • मोरारजी देसाई यांना 1.4 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे.

एकंदरीत या संपूर्ण टक्केवारीवर नजर टाकली तर हे लक्षात येतं की आत्तापर्यंत भारताचे जे जे पंतप्रधान होऊन गेले त्यापैकी अटलबिहारी वाजपेयी 20.3 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 34 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे. एकंदरीत काय तर लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच ठरले आहेत.

Mood Of The Nation : Who is the most popular Prime Minister of India? Who else is Narendra Modi? Read India Today’s survey

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात