शनिवारी कर्नाटकात धडकणार मान्सून, तामिळनाडूत पावसाला सुरुवात; 18 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मान्सून गुरुवारी केरळमध्ये पोहोचला असून वेगाने प्रगती करत आहे. शनिवारपर्यंत तो कर्नाटकात पोहोचेल. दुसरीकडे, दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण तामिळनाडू आणि ईशान्य राज्यांमध्ये मान्सून पोहोचेल.Monsoon to hit Karnataka on Saturday, rains start in Tamil Nadu; Will reach Maharashtra by June 18

IMD नुसार, 10 जूनपर्यंत मान्सून दक्षिणेकडून पुढे सरकत महाराष्ट्रात पोहोचेल आणि ईशान्येकडील राज्ये व्यापून पश्चिम बंगालमार्गे बिहारमध्ये पोहोचेल. 15 जूनपर्यंत मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि संपूर्ण बिहार व्यापू शकतो.



दुसरीकडे, देशाच्या पूर्वेकडील भागात पुढील 3-4 दिवस उष्णता वाढेल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. उत्तर-पश्चिम भारतात म्हणजे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस तापमान सामान्यपेक्षा 3-5 अंशांनी जास्त असेल.

मुंबईत समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांनी बोटी बांधल्या

मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वी मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रकिनारी बांधल्या आहेत. पावसामुळे पुढील दोन महिने समुद्रापासून दूर राहणेच खलाशांचे मत आहे. किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोव्यात रिमझिम पाऊस सुरू आहे.

मुंबईसह तळकोकणात 18 जूनला येणार मान्सून

मान्सून 18 जूनदरम्यान मुंबईसह तळकोकणात येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत स्थिरावल्यानंतर तो सह्याद्री ओलांडत उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणत: दहा दिवसांनी तो राज्यात येतो.

शुक्रवारपासून (दि. 9) 12 जूनपर्यंत मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

Monsoon to hit Karnataka on Saturday, rains start in Tamil Nadu; Will reach Maharashtra by June 18

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात