नाशिक : क्रिकेटच्या मैदानावर केले माकड चाळे; पण दणकून पराभवानंतर पाकिस्तान्यांना आले खिलाडू वृत्तीचे उमाळे!!, असला प्रकार दुबईतल्या क्रिकेट स्टेडियम मधून समोर आला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा दणकून पराभव केला. या तीनही सामन्यांमधून पाकिस्तानी खेळाडूंचे मैदानावरचे माकड चाळे सगळ्यांना उघड दिसले. पाकिस्तानच्या कुठल्या खेळाडूने विमाने पाडल्याची नक्कल केली. कुणी बॅटच्या एके 47 रायफल मधून मैदानावरच गोळीबार केला. भारतीय खेळाडूंनी मैदानावरच पाकिस्तानी खेळाडूंच्या माकड चाळ्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. पण आपल्या खेळातल्या गुणवत्तेवर त्याचा दुष्परिणाम होऊ दिला नाही. भारतीय टीमने सलग तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला धूळ चारली. Mohsin Naqvi
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा आणि आशियाई क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष तिथला मंत्री मोहसीन नकवी याने आशिया चषक सुरू असताना भारताविरुद्ध ट्विट केली. भारताने अंतिम सामना जिंकल्यानंतर सुद्धा स्वतःच्या हस्ते भारताला ट्रॉफी देण्याचा आग्रह धरला. परंतु भारतीय संघाने त्याच्या हातातून ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यावर मोहसीन नक्वी हा ट्रॉफी घेऊन मैदानातून पळून गेला.
– पाकिस्तानी माध्यमांचा थयथयाट
पण त्यानंतर मात्र सगळ्या पाकिस्तान्यांना खिलाडूवृत्तीचे उमाळे आले. भारतीय क्रिकेट टीमने मोहसीन नक्वी याच्या हस्ते विजय ट्रॉफी स्वीकारली नाही, याचा अर्थ भारतीय खेळाडूंनी खिलाडू वृत्ती दाखविली नाही, असा आरोप पाकिस्तानी माध्यमांमधून करण्यात आला. स्वतः मोहसीन नकवी आणि पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीट विरोधात दुसरी ट्विट केली. क्रिकेटच्या मैदानात युद्धाचे मैदान आणायचे काही कारण नाही. पण युद्धाचाच इतिहास पाहायचा झाला, तर पाकिस्तानने युद्धाच्या मैदानात भारताचा पराभव केला, असा दावा करणारे ट्विट मोहसीन नक्वी याने केले. ख्वाजा आसिफने देखील त्याला दुजोरा दिला. भारताने आणि भारतीय खेळाडूंनी खिलाडू वृत्ती दाखविली नाही, असा आरोप या दोघांनी केला. पाकिस्तानी माध्यमांनी सुद्धा याच प्रकारचा थयथयाट केला.
– बीसीसीआय शिकवणार धडा
पण भारत यापैकी कुठल्याही प्रकाराला बधला नाही. भारताने आता नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेट संघाच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या बैठकीत मोहसीन नक्वीचा निषेध करायचा निर्णय घेतला आहे. हा निषेध साधा नसून मोहसीन नक्वी याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातले पहिले पाऊल असेल. मोहसीन नक्वी दुबईच्या मैदानातून भारताच्या हक्काची ट्रॉफी घेऊन निघून गेला. त्याची राजकीय किंमत वसूल करून घ्यायचा चंग भारतीय क्रिकेट नियामक महासंघाने बांधलाय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App