‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याला न जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मोहन यादवांची टीका, म्हणाले…

…याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल, असा इशाराही दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

उज्जैन : अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठे’वरून देशात राजकारण तापू लागले आहे. जिथे भाजप हा एक मोठा कार्यक्रम म्हणून सादर करत आहे. त्याचवेळी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाला भाजप आणि संघ परिवाराचा (आरएसएस) राजकीय कार्यक्रम म्हणत सहभागी होण्यास नकार दिला आहे. यानंतर भाजपकडून विरोधकांवर हल्लाबोल झाला आहे. हा देवी-देवतांचा अपमान असल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.Mohan Yadavs comment on Congresss decision not to go to Pranapratishtha Sohala



अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्याबद्दल विरोधी पक्षांवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी निशाणा साधला, काँग्रेसला हिंदू देवी देवतांकडे बोटे दाखवण्याची किंमत चुकवावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. ‘ यादव रविवारी उज्जैन जिल्ह्यातील नागदा येथे एका परिषदेत बोलत होते. काँग्रेसने आपल्या पापांची माफी मागावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेस आणि आमच्यात वैयक्तिक वैर नसून आमच्यात वैचारिक लढा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस आमच्या देवी-देवतांकडे बोट का दाखवते? याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल.

Mohan Yadavs comment on Congresss decision not to go to Pranapratishtha Sohala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात