मोहन चरण माझी यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदीही होते उपस्थित


विशेष प्रतिनिधी

भुवनेश्वर: ओडिशामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. ओडिशाचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भुवनेश्वरमधील जनता मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजधानी भुवनेश्वरमध्ये आयोजित मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही पोहोचले होते.Mohan Charan Majhi took oath as Chief Minister of Odisha

ओडिशाचे मुख्यमंत्री-नियुक्त मोहन चरण माझी यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळासह शपथ घेतली. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. यासोबतच २४ वर्षांनंतर राज्यात नवा मुख्यमंत्री आला आहे. तत्पूर्वी आंध्र प्रदेशातील टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनीही राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबत पवन कल्याण आणि नारा लोकेश यांनीही शपथ घेतली आहे.



मोहन चरण माझी यांच्यासोबत ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देव आणि पार्वती परिदा यांच्यासह इतर नेत्यांनीही शपथ घेतली. माझी यांच्या शपथविधी सोहळ्याला ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते उपस्थित होते. ओडिशाच्या शपथविधी समारंभात सुरेश पुजारी, रबीनारायण नाईक, नित्यानंद गोंड आणि कृष्ण चंद्र पात्रा यांनी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह काही आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये मुकेश महिलांग, बिभूती जेना, पृथ्वीराज हरिश्चंदन, कृष्ण चंद महापात्रा, सूर्यबंसी सूरज, नित्यानंद गोंड, संपद स्वई आणि प्रवी नायक यांचा समावेश आहे. ओडिशामध्ये भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या 147 पैकी 78 जागा जिंकल्या आहेत. मात्र, याआधी मुख्यमंत्रिपदासाठी धर्मेंद्र प्रधान यांचे नाव पुढे केले जात होते. धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातून खासदार म्हणून निवडून आले असून त्यांना केंद्रात शिक्षणमंत्री बनवण्यात आले आहे.

Mohan Charan Majhi took oath as Chief Minister of Odisha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात