मोहम्मद उमर गौतमने केले २०० हिंदू मुलींचे धर्मांतर; उत्तर प्रदेशातील धर्मांतराचे गुजरात कनेक्शन!!


प्रतिनिधी

मुंबई : गुजरातमध्ये वडोदरा येथील एका धर्मदाय ट्रस्टच्या पदाधिका-याने विदेशातून आलेल्या प्रचंड निधीचा वापर करून २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचा निकाह लावून दिला आहे. याप्रकरणी वडोदरा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टीवर तसेच सहकाऱ्यांवर परदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. यानंतर हा निधी धर्मांतर करण्यासाठी वापरला गेला.Mohammed Umar Gautam converts 200 Hindu girls

संबंधित हा निधी मशिदींच्या बांधकामासाठी, CAA विरोधी आंदोलनाला आणि २०२० मध्ये दिल्लीतील दंगलीनंतर लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी, दंगलीच्या आरोपाखाली अटक केलेल्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी या ट्रस्टने वापर केला. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी, मोहम्मद उमर गौतम याने २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचे लग्न लावून दिले तसेच सुमारे १००० लोकांचे धर्मांतर केले. कथित स्वरुपी इस्लाम धर्म स्वीकारलेल्या लोकांमध्ये १० कर्णबधिरांचा समावेश असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मोहम्मद उमर गौतम हा दिल्लीचा रहिवासी असून, १८६० पानांच्या आरोपपत्रात पाच आरोपींची नावे आहेत. हे आरोपपत्र वडोदरा येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. ए. पटेल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी गौतमला एटीएसने पकडले

या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद उमर गौतमला यूपी एटीएसने (ATS) जूनमध्ये पकडले होते. त्यानंतर यूपी एटीएसने गौतमचा साथीदार शेख याला वडोदरा येथून पकडले. धर्मदाय ट्रस्टच्या निधीचा गैरवापर करून धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यानंतर ऑगस्टमध्ये वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) शेख, गौतम आणि इतर साथीदारांविरुद्ध विविध समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

Mohammed Umar Gautam converts 200 Hindu girls

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात