नाशिक : “पिक्चर अभी बाकी है”, असे म्हणत काही माध्यमांनी शरद पवारांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अजूनही ऑफर असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. अजित पवारांना शरद पवारांपासून फोडून बाजूला काढून भाजप नेतृत्वाचे भागले नाही म्हणून पवारांनाच ऑफर दिल्याच्या बातम्या न्यू इंडियन एक्सप्रेस आणि लोकमतने दिल्या आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पवारांच्या पाठिंबाची गरज उरली आहे का?? आणि तशी गरज असती तर अजित पवारांना फोडण्याआधी त्यांनी पवारांनाच थेट फार मोठी ऑफर देऊन भाजपच्या दिशेने वळवले नसते का??, हे सवाल मात्र या निमित्ताने तयार झाले आहेत. या सवालांची उत्तरे दोन्ही बातम्यांमध्ये नाहीत. Modi’s so called offer to sharad pawar; only using his nuisance value to create cracks in I.N.D.I.A
त्यामुळे नेहमीप्रमाणे पवार कॅम्पमधूनच ही पुडी सोडण्यात आली नाही ना!!, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीला पुरेसे बहुमत असतानाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने राजकीय चाल खेळत अजित पवारांना शरद पवारांपासून बाजूला करत उपमुख्यमंत्री केले. त्यांना त्यांच्या आवडीचे अर्थ खातेही दिले. यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या राजकीय निधी बुभुक्षित आमदारांची गरज भागवली. पण आता त्या पलीकडे जाऊन पवारांनाच भाजपच्या नेतृत्वाने ऑफर दिली अशा बातम्या म्हणजे ती पवारांना खरी ऑफर नसून विरोधी I.N.D.I.A आघाडीत संशयाची पेरणी करण्याचा कावा असल्याचेच उघड दिसून येते.
पवारांची राजकीय भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. “जित भी मेरी पट भी मेरी” असा त्यांचा नवा डाव आहे. महाराष्ट्रात काहीही केले तरी ते पवारांनी केले अशी म्हणायची फॅशन पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी रूढ केली आहे. पण सगळेच राजकारण खऱ्या अर्थाने पवारांच्या दिशेने जात नाही ही वस्तुस्थिती आहे. उलट दिल्लीतल्या प्रत्यक्ष राजकारणात पवारांची पत पूर्ण घटली आहे.
राष्ट्रवादी फुटल्या नंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षांची जी “पॉलिटिकल स्पेस” तयार झाली आहे. ती भरून काढायला काँग्रेसचे नेते उतावीळ झाले आहेत. मग भले पवार हात जोडून फिरत महाराष्ट्रात स्वतःचा पक्ष वाढवणार असतील तरी संशयाच्या वातावरणामुळे त्यांच्या पक्ष वाढीला त्यांच्याच राजकीय कर्तृत्वातून मर्यादा आहेत आणि हे काँग्रेस सारख्या मुरब्बी आणि जाणकार नेत्यांच्या पक्षाने निश्चित ओळखले आहे.
NDA विरुध्द INDIA : दोघांत तिसरा आणि चौथा; लोकसभेत दुरंगी लढाई विसरा!!
अशा स्थितीत पवारांना कोणतीही ऑफर देऊन मुळात मोदींच्या भाजपचा फायदा काय??, हा सवाल आहे. न्यू इंडियन एक्सप्रेस आणि लोकमतच्या बातमीनुसार लोकसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप आणि अजितदादा यांच्या युतीला काही जागा कमी पडत आहेत. त्यामुळे पवारांनाही आपल्याबरोबर घेऊन त्यांना त्यांच्या आवडीचे “उच्च” खाते देऊन सामावून घेण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मनसूबा असल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले आहे. यात शिवसेना भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा कमी मिळत असल्याचा माध्यमांचा स्वतःचाच दावा आहे. त्याला भाजपच्या कुठल्याही सर्वेचा आधार नाही.
पण त्या पलीकडे जाऊन पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी त्यांच्या आवडीचे “उच्च” खाते देणारे मोदी भाजपमध्ये 75 वर्षांचा रिटायरमेंटचा निकष टिकवून ठेवू शकतील का??, हा साधा सवालही ही बातमी देणाऱ्या माध्यमांना पडलेला नाही!!
मोदींची कॅल्युलेशन्स समजत नाहीत
आत्तापर्यंत मोदींची कुठलीच कॅल्क्युलेशन्स कोणत्याच माध्यमांना खऱ्या अर्थाने पकडता आली नाहीत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पवारांचे नाव मोदींचे मित्र म्हणून चालवून झाले, ते दोन निवडणुकांमध्ये फेल गेले. देशभरातल्या कोणत्याही माध्यमांना रामनाथ कोविंद किंवा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होतील याची साधी भनकही लागली नव्हती. मोदींच्या कुठल्याच धोरणाची भनक कोणत्याही माध्यमांना लागू शकत नाही. कारण माध्यमांना भाजपमधले कुठलेच वरिष्ठ सोर्सेस उपलब्ध नाहीत. भाजप मधली फट त्यांना शोधून काढता येत नाही.
माध्यमांची भागवाभागवी
त्यामुळे काँग्रेस स्टाईलचे रिपोर्टिंग करून माध्यमांना आपले “भागवून घ्यावे” लागते. मोदींनी पवारांना दिलेली ऑफर हा अशाच “भागवून घेण्यातल्या” बातमीतला एक भाग आहे. मोदी आणि पवारांची मैत्री सर्वश्रूत आहे. पण ती मैत्री ना पवारांनी राजकीय रूपांतरित केली, ना मोदींनी कधी राजकीय रूपांतरित केली. इतकेच नाही तर खुद्द भाजपमध्ये एका चढ एक ऑप्शन्स खुले असताना मोदी पवारांना कोणत्याही “उच्च” पदाची ऑफर देऊन महाराष्ट्रातला कथित बॅकलॉग भरून काढतील हे म्हणणे देखील माध्यमांनी स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करण्यासारखे आहे.
मूळात विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे कधीही न गेलेले पवारांचे राजकीय महत्त्व संपत असताना केवळ माध्यमांच्या नॅरेटिव्हच्या आधारे ते टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. 35 टक्के वाल्याला मेरिटवाला समजण्याचा हा प्रकार आहे!!
एरवी पवारांकडे असणारी “पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू” विरोधी I.N.D.I.A आघाडीत त्यांच्याविषयीची संशयाची पेरणी करून मोदी वापरून घेतील. यापेक्षा मोदींनी पवारांना दिलेल्या कथित ऑफरला फारशी राजकीय किंमत नाही, ही वस्तुस्थिती आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App