प्रतिनिधी
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताचे दमदार पाऊल भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या कमिशनिंगच्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयी यांना सहभागी करून घेतले. देशहिताच्या आणि राष्ट्रीय स्वरूपाच्या कार्यक्रमात पक्षभेद विसरले गेले होते. मात्र, आज त्याच केरळमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्टांवर हल्लाबोल केला आहे. Modi’s message of nation strengthening from Kerala
संपूर्णपणे भारतीय बनावटीची विमानवाहू नौका “आयएनएस विक्रांत” हिचे कमिशनिंग काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोचीन शिपयार्ड मध्ये झाले. यावेळी केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन हे आयएनएस विक्रांतवर उपस्थित होते. अर्थात हा राष्ट्रीय स्वरूपाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे येथे पक्षभेदाला थारा नव्हता. कोणत्याही नेत्याने पक्षीय दृष्टिकोनातून तेथे भाषणे केली नाहीत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट हे देखील उपस्थित होते. देशाच्या संरक्षने इतिहासातले महत्त्वाचे पाऊल म्हणून संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांतचे कमिशनिंग या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. तेथे औचित्यपूर्ण भाषणांमध्ये कोणताही राजकीय संदर्भ आला नाही.
मात्र आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या केरळ दौऱ्यात काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे कम्युनिस्ट राजकीय विचार प्रणाली संपूर्ण जगभरातून नाहीशी होत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्ष देखील भारताच्या राजकारणातून नाहीसा होत चालला आहे, अशा शब्दांमध्ये दोन्ही पक्षांवर अमित शहा यांनी हल्ला केला. अमित शहा आहे दक्षिण विभागीय परिषदेच्या निमित्ताने केरळ दौऱ्यावर आहेत. तेथे भाजपच्या राजकीय कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोन्ही पक्षांच्या राजवटींचा जोरदार समाचार घेतला. काँग्रेसने परिवार वादाच्या पलिकडे दुसरे काही पाहिले नाही, तर कम्युनिस्टांनी देशद्रोह्यांची हात मिळवणी करायला देखील मागेपुढे पाहिले नाही, असे शरसंधान अमित शहा यांनी साधले.
केरळमध्ये गेल्या दोन दिवसातच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांचे कार्यक्रम संपूर्ण राज्य गाजवून गेले. मात्र या दोघांच्याही कार्यक्रमाचे औचित्य पूर्णपणे वेगळे होते त्यामुळे तिथली भाषणे देखील त्या औचित्याला धरूनच झाली. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हिताच्या गोष्टी सांगितल्या, तर अमित शहा यांचे भाषण स्वाभाविकपणे संपूर्णपणे राजकीय स्वरूपाचे राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App