वृत्तसंस्था
सिडनी : आज सिडनी मोदीमय झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीतील कुडोस बँक एरिनात प्रचंड उत्साहाने भारलेल्या भारतीय समूदायाला संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मोदींनी आपल्या सहज संवादशैलीतून भारत – ऑस्ट्रेलिया संबंध, भारतीय संस्कृती, भारताची प्रगती यासह अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी हजारो भारतीयांच्या उत्साह सागरात मोदीमय सिडनी न्हाऊन निघाली.Modimay Sydney bathed in the huge enthusiasm of thousands of Indians!!
ऑस्ट्रेलियाचे PM अँथनी अल्बानीज म्हणाले, ‘मोदी इज द बॉस’
मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही उपस्थित होते. ते म्हणाले, ‘मोदी इज द बॉस’. भारतीय पंतप्रधानांच्या स्वागताशी संबंधित कार्यक्रमांबाबत ते म्हणाले की, येथे पहिल्यांदाच एखाद्याचे इतके भव्य स्वागत करण्यात आले आहे. पीएम मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. दोन्ही देश त्यांच्या लोकशाही मूल्यांच्या आधारे संबंध अधिक दृढ करतील.
मोदी यांच्या भाषणातील मुद्दे…
एक काळ असा होता की, भारत-ऑस्ट्रेलिया संबंध क्रिकेट, कॉमनवेल्थ आणि करी या तिन्ही ‘सी’ वर अवलंबून आहेत. तेव्हा ऑस्ट्रेलियाचे संबंध थ्रीडीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत असे. आमच्या नात्याचे वर्णन कधी C तर कधी D असे केले जात असे. पण आता आम्हाला C आणि D ची गरज नाही. आता आम्ही परस्पर विश्वास आणि भागीदारीने एकत्र आलो आहोत.
हिंद महासागर आपल्याला जोडतो. क्रिकेटशी आमचा संबंध कधीपासून आहे माहीत नाही, पण आता चित्रपटही आम्हाला जोडत आहेत. जरी आपल्या देशात सण वेगळे साजरे केले जातात, परंतु तरीही आपण दिवाळी आणि बैसाखी यांसारख्या सणांच्या माध्यमातून जोडलेले आहेत.
हॅरिस पार्क हे अनेकांसाठी ‘हरीश पार्क’ बनले आहे. सिडनीजवळ लखनऊ नावाचे एक ठिकाणही आहे. ऑस्ट्रेलियात काश्मीर, मलबार अशा रस्त्यांवरून जाण्याची झलक जाणवते.
भारताकडे सामर्थ्य आणि संसाधनांची कमतरता नाही. भारतामध्ये जगातील सर्वात मोठा आणि युवा प्रतिभांची फॅक्ट्री आहे.
भारताने जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवला. आज जगातील नंबर वन स्मार्ट फोन डेटा वापरणारा देश फक्त भारत आहे.
ऑस्ट्रेलियाला भारताप्रती विशेष प्रेम आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया याचे नाते वेगळे आहे.
ऑस्टेलियात राहून अभ्यास करणारे विद्यार्थी देखील मदतीसाठी पुढे आले. भारतीय कुठेही राहो, त्यांच्या मनात मानवीय भाव त्यांच्यात असतो. भारत कुठेही मदतीसाठी तयार असतो. कोणतेही संकट आले तरी भारत समाधान मदतीसाठी तत्पर असतो.
भारताने नेहमी विविध देशांना एकजूट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे.
तुर्कियेत भूकंप झाला तेव्हा भारताने ऑपरेशन राबवत मदत केली.
सबका साथ, सबका विश्वास, सबका विचार या विचाराने भारत काम करत आहे. ऑस्ट्रेलियात देखील भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याला मोठ्या उत्साहात साजरे केले गेले.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा संबंध फक्त सुखातील साथीदार नाही, तर दुःखात देखील एकमेकांचे साथीदार आहेत. दोन्ही देशांमध्ये पदवीबाबत चर्चा सुरू झाली आहे. याचा फायदा दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
ब्रिस्बेनमध्ये भारताचे नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यात येणार आहे.
भारतीय वंशाच्या लोकांना पंतप्रधान म्हणाले – परदेशात राहूनही आपल्या मुळांशी जोडलेले राहा. तुम्ही तिथे भारताचे राजदूत आहात. तुम्ही भारतात याल तेव्हा मी तुम्हाला ऑस्ट्रेलियन कुटुंबांना सोबत आणण्यास सांगत आहे. त्यामुळे त्यांना भारताची संस्कृती समजून घेण्याची संधी मिळेल.
या कार्यक्रमासाठी विविध भागातून आले लोक
या कार्यक्रमासाठी लोकांना ट्रेन आणि खाजगी चार्टरने सिडनीला आणण्यात आले, ज्यांना ‘मोदी एअरवेज’ आणि ‘मोदी एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी ऑलिम्पिक पार्कमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत हॅरिस पार्क परिसराचे नाव ‘लिटिल इंडिया’ असे ठेवण्यात येणार आहे.
PM मोदी म्हणाले, मी सहज समाधानी होणारा माणूस नाही आणि मला माहिती आहे की ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज देखील असेच आहेत. मला खात्री आहे की, जेव्हा आम्ही सिडनीमध्ये भेटू तेव्हा आम्ही आमच्या नातेसंबंधांना वेगळ्या पातळीवर कसे नेऊ शकतो, एकत्र काम कसे करू शकतो आणि सहकार्य कसे वाढवू शकतो यावर चर्चा करू. राजीव गांधी यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App