भाजप 10 मार्चपूर्वी 300 जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: लोकसभा 2024 मध्ये मिशन 400 साध्य करण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार निवडीसंदर्भात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक भाजप मुख्यालयात झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.Modi will contest from Varanasi and BJP will contest 74 Lok Sabha seats in Uttar Pradesh sources said
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजप 74 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मित्रपक्षांना 6 जागा मिळतील. भाजप आरएलडीसाठी लोकसभेच्या 2 जागा, अपना दलासाठी 2 लोकसभेच्या जागा, सुभासपा आणि निषाद पक्षासाठी प्रत्येकी 1 लोकसभा जागा सोडणार आहे. गुरुवारी रात्री भाजपने वाराणसीसह लोकसभेच्या सुमारे 50 जागांसाठी उमेदवार निश्चित केले.
पंजाब, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उमेदवारांचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या तीन राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी युती करण्यासाठी भाजपची चर्चा सुरू आहे. भाजप पंजाबमध्ये अकाली दल, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि जनसेनेशी बोलत आहे. तर तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकशी चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप 10 मार्चपूर्वी 300 जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते. भाजप उमेदवारांची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला जाहीर करू शकते. गेल्या सार्वत्रिक निवडणुका 2019 मध्येही हा गेम प्लॅन होता. निवडणूक जाहीर होण्याच्या काही आठवडे आधी म्हणजे 21 मार्च रोजी भाजपने 164 उमेदवारांची घोषणा केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App