मोदी अयोध्येतून लढणार होते, ते मोदी खरे हिंदूच नाहीत; लोकसभेत राहुल गांधींचे अनेक “जावईशोध”; मोदींचेही कडक प्रत्युत्तर!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येमधून लढणार होते, ते मोदी खरे हिंदू नव्हेतच, असे अनेक “जावईशोध” विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत लावले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार दर्शक ठरावावर भाषणाची सुरुवात विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी केली. त्यांनी सुमारे 90 मिनिटांचे भाषण केले. त्यामध्ये त्यांनी हिंदू समाजाला हिंसक ठरवले पण त्याचबरोबर अनेक “जावईशोध” देखील लावले. पंतप्रधान मोदी अयोध्येतून लोकसभेची निवडणूक लढवणार होते, हा असाच एक “जावईशोध” त्यांनी लावला. भाजपचा सर्वे विरोधात गेला म्हणून मोदी अयोध्येमध्ये लढायला आले नाहीत. ते तिथून लढले असते तर पराभूत झाले असते, असा दावा राहुल गांधी यांनी केला. Modi was going to fight from Ayodhya, that Modi is not a true Hindu

भगवान शिव आणि गुरु नानक यांचे फोटो दाखवून राहुल यांनी संसदेत भाषणाला सुरुवात केली. राहुल काही बोलण्यापूर्वीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवले. बिर्ला म्हणाले की, तुमचे सदस्य नियम 353 बद्दल सांगत होते. सभागृहाने नियम आणि कार्यपद्धती पाळली पाहिजे, असे तुम्ही म्हणाला होता. नियमानुसार सभागृहात कोणतेही फोटो किंवा फलक दाखवू नयेत.

यावर राहुल म्हणाले की, सदनात भगवान शिवाचा फोटो दाखवण्यास मनाई आहे का? इतर गोष्टींचे फोटो इथे दाखवता येतील, पण भगवान शंकराचे चित्र दाखवता येत नाही. त्यांच्याकडून आम्हाला संरक्षण मिळाले असे म्हणत असेल, संरक्षण कसे मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तर मला फोटो दाखवू दिला जात नाही. यानंतर माझ्याकडे आणखी फोटो आहेत. मला सर्व काही दाखवायचे होते. अध्यक्ष महोदय, हे फोटो संपूर्ण भारताच्या हृदयात आहेत. संपूर्ण भारताला हे माहिती आहे आणि समजले आहे.

या गोंगाटात राहुल मोठ्या आवाजात म्हणाले की नरेंद्र मोदी म्हणजे काही सगळा हिंदू समाज नाहीत. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. हा भाजपचा ठेका नाही. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे 24 तास हिंसा करतात. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून निषेध केला. अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

राहुल गांधींच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यांची जुगलबंदी रंगली.

राहुल गांधींनी त्यांच्या भाषणादरम्यान भगवान शंकराचा फोटो दाखवला. त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवत नियमावली सांगितली. आम्ही सभागृहात शिवजींचे चित्रही दाखवू शकत नाही, तुम्ही मला थांबवत आहात, असे राहुल म्हणाले. माझ्याकडे आणखी चित्रे होती जी मला दाखवायची होती.

राहुल गांधींनी भगवान शिव यांना त्यांचे प्रेरणास्थान मानले आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले. डाव्या हातात त्रिशूळ म्हणजे अहिंसा. आम्ही कोणत्याही हिंसाचाराशिवाय सत्याचे रक्षण केले आहे. भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्यासाठी फक्त सत्ता महत्त्वाची आहे.

माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ईडीने चौकशी केली, अधिकारीही हैराण झाले. इंडिया ब्लॉकच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. ओबीसी-एससी-एसटीबद्दल बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. भगवान शिवाप्रमाणे काँग्रेस पक्षही अभय मुद्रेत आहे. मुस्लिम आणि शीख धर्मातही अभय मुद्रा पाहिली जाते.

एके दिवशी मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले की, भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला – डरो मत, डराओ मत. शिवजी म्हणतात- डरो मत, डराओ मत आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाकतात.

दुसरीकडे, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, द्वेष-द्वेष-द्वेष करतात… तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. पीएम मोदी आपल्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर गोष्ट आहे. यावर राहुल गांधी लगेच पलटले आणि म्हणाले की, पीएम मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही.

अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याने जे बोलले त्याबद्दल माफी मागावी. कोट्यवधी लोक या धर्माला अभिमानाने हिंदू म्हणतात. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी एकदा इस्लाममधील अभय मुद्रा या विषयावर इस्लामिक विद्वानांचे मत घ्यावे. ज्यांनी आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाला धोका दिला त्यांना अभयबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.

राहुल गांधी म्हणाले की हिंदू भीती पसरवू शकत नाहीत. त्यांनी शिवजींचे चित्र झळकावत भाजप भीती पसरवत असल्याचे सांगितले. मला अयोध्येपासून सुरुवात करू द्या. राहुल यांनी असे सांगताच अमित शहा उभे राहिले आणि त्यांना हा नियम लागू होत नाही का, असा सवाल केला. ते संपूर्ण भाजपला हिंसाचार पसरवणारा म्हणत आहेत. सदन व्यवस्थित नाही. सभागृह असे चालणार नाही.

राहुल गांधी म्हणाले की, रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमधून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढवणार होते परंतु भाजपने केलेल्या सर्वे मध्ये तिथे पराभवाचा धक्का बसला असे समजले त्यामुळे ते अयोध्येमध्ये आले नाहीत. फैजाबादचे खासदार अवधेश पासींकडे बोट दाखवत ते म्हणाले की हा संदेश तुमच्या समोर बसला आहे. काल कॉफी घेताना मी त्यांना विचारले काय झाले. अयोध्येत तुम्ही जिंकत आहात हे तुम्हाला केव्हा कळले? पहिल्या दिवसापासून माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येत विमानतळ बांधले, जमीन हिसकावून घेतली आणि आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. सर्व छोटी दुकाने आणि छोट्या इमारती पाडून त्या लोकांना रस्त्यावर फिरायला लावले. अयोध्येच्या उद्घाटनावेळी अयोध्येतील जनतेला खूप वाईट वागवले.

तिथे अंबानीजी होते, अदानीजी होते, पण अयोध्येतून कोणी नव्हते. नरेंद्र मोदीजींनी अयोध्येतील लोकांच्या मनात भीती निर्माण केली. त्यांच्या जमिनी घेतल्या, घरे पाडली, पण उद्घाटन तर सोडा, त्यांना बाहेरही उभे राहू दिले नाही.

राहुल म्हणाले की त्यांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली की मी (मोदींनी) अयोध्येत लढायचे की नाही याची दोनदा नरेंद्र मोदींनी चाचणी केली. सर्वेक्षकांनी अयोध्येला जाऊ नका, तिथली जनता तुम्हाला पराभूत करेल, असे सांगितले, त्यामुळे पंतप्रधान वाराणसीला गेले आणि तेथून निसटता विजय मिळवला.

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी भाजपच्या लोकांना घाबरवतात, अयोध्येतील लोकांना सोडा. राजनाथ आणि गडकरी त्यांच्यासमोर नमस्तेही म्हणत नाहीत. यावर स्पीकर ओम बिर्ला राहुल यांना म्हणाले, तुम्ही धोरणांवर बोला. एखाद्यावर वैयक्तिक हल्ले करणे योग्य आहे का?

पंतप्रधान मोदींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी उभे राहिले आणि म्हणाले की, लोकशाहीने मला शिकवले आहे की विरोधी पक्षाच्या नेत्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. यानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी अयोध्येवर जे काही बोललो ते अनुराग ठाकूरजीही अयोध्येबद्दल बोलत होते.

संसदेच्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा सुरू होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपला हिंसाचार करणारा पक्ष असे वर्णन केले. त्यावर पंतप्रधान मोदींनी उभे राहून निषेध केला. अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

Modi was going to fight from Ayodhya, that Modi is not a true Hindu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub