विशेष प्रतिनिधी
समस्तीपूर : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आज पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समस्तीपुर मध्ये भर दिवसा सभेला जमलेल्या लोकांच्या मोबाईलची लाईट लावून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा लालटेन म्हणजेच कंदील विझवून टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात समस्तीपूर मधून केली. त्याआधी त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री करपुरी ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मोठ्या जन सभेला संबोधित केले. या सभेदरम्यानच मोदींनी अत्यंत नाटकीय पद्धतीने सभेला जमलेल्या लोकांना भर दिवसा मोबाईलची लाईट लावायला सांगितली.
लोकांनी मोदींच्या आदेशानुसार उभे राहून मोबाईलची लाईट लावली त्याबरोबर मोदींनी प्रश्न विचारला तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यात लाईट आहे आता तुम्हाला लालटेनची गरज आहे का??, त्याबरोबर लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि त्यांनी आपल्याला लालटेनची गरज नसल्याचा गजर केला. लालटेन म्हणजेच कंदील लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे चिन्ह आहे. त्यावर शिक्का मारायचा नाही किंवा त्याचे बटन दाबायचे नाही, असे पंतप्रधान मोदींनी सूचकपणे सांगितले.
या सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्यापासून ते तेजस्वी यादव यांच्या शिक्षक भरती घोटाळेपर्यंत सगळे घोटाळे बाहेर काढले. लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांना आपल्या मुलांचे कल्याण करायचे आहे. बिहारच्या जनतेच्या कल्याणाशी त्यांचा काही संबंध नाही त्यामुळे बिहारच्या युवकांनी यादव आणि गांधींच्या नादी न लागता भाजप आघाडीच्या सरकारला मतदान करावे, असे आवाहन मोदींनी केले. त्यानंतर मोदींनी बेगूसराय मध्ये जाऊन जनसभेला संबोधित केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App