वृत्तसंस्था
एव्हियन, (फ्रान्स) : Modi – Trump meeting अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत मोदींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होर्मूज मध्ये तीन भारतीय खलाशी मारले गेल्याचा विषय उपस्थित केला. त्यालाही डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले, पण ते “सौम्य” होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्याचा सगळा भर नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक स्तुतीवर आणि भारत – अमेरिका संबंधांवर दिला.Modi – Trump meeting
– मोदी कठोर वाटाघाटी करणारे
पंतप्रधान मोदी आणि रशिया-युक्रेन युद्धाबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मोदी अत्यंत कठोर वाटाघाटी करणारे (tough negotiator) आहेत. या माणसाकडे पहा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ते दिसायला अतिशय छान आणि सुंदर आहेत. ते एखाद्या देवदूतासारखे छान दिसतात. पण प्रत्यक्षात, ते तितकेच कठोर आणि आक्रमक (killer) आहेत. पण ते दिसायला इतके चांगले आहेत की समोरच्याला आश्चर्यचकित करतात. असे काही मोजकेच लोक असतात. लोक म्हणतात की ते खूप चांगले माणूस आहेत; मी म्हणतो की ते खूप कठोर आहेत. ते एक कठोर व्यापारी आहेत; त्यांना भारतीय लोकांवर प्रेम आहे, पण अमेरिकेवरही तितकेच प्रेम आहे. ह्युस्टनमध्ये आमचा ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम झाला होता. स्टेडियम पूर्ण भरले होते. भविष्यात मी कधीतरी भारताला भेट देईन.Modi – Trump meeting
– भारताशी संबंध उत्तम
भारत-अमेरिका संरक्षण संबंधांवर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की दोन्ही देशांचे संबंध हे एक उत्तम नाते आहे. जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर आम्ही त्यांना मदत करण्यासाठी तिथे असू. जर कोणी या व्यक्तीवर म्हणजे मोदींवर हल्ला केला, तर आम्ही तिथे असू. जर आमच्यावर हल्ला झाला आणि ते (पंतप्रधान मोदी) नेते असतील, तर आम्ही मदतीसाठी तिथे त्यांच्या संरक्षणासाठी हजर असू.
https://x.com/ANI/status/2067251837359821115?t=HghhZHtRIfRdLFmOF85uVA&s=08
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, माझी मागील भारत भेट अतिशय उत्तम होती. आम्ही त्या नवीन स्टेडियमचे उद्घाटन केले होते आणि मला वाटते की तिथे ३०००-४००० लोक होते. त्या स्टेडियमची क्षमता सुमारे १,५०,००० इतकी होती, पण बाहेर २,५०,००० लोक होते आणि मैदानावर १,००,००० लोक होते. ते विक्रम मोडले गेले आहेत की नाही, हे मला माहिती नाही. पण भारतात माझा वेळ खूप छान गेला.”
– तेलाचे भाव घसरले
रशियावर पुन्हा काही निर्बंध लादले जातील का?, असे विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही त्याबाबत विचार करत आहोत. तेलाचे भाव किती खाली येतात याकडे आमचे लक्ष आहे; ते वेगाने घसरत आहेत. भाव खाली आले आहेत आणि लवकरच ते चार महिन्यांपूर्वीच्या पातळीवर येतील. शिवाय, आपल्याला अणुशस्त्रमुक्त इराण मिळेल; मला खात्री आहे की संबंधित पंतप्रधानांचीही याबद्दलची भूमिका अतिशय ठाम आहे.”
– भारतीय खलाशांचा विषय
होर्मुझच्या सामुद्रधुनी मधल्या हल्ल्यात ३ भारतीय खलाशी मारले गेल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला त्याबद्दल समजले आहे. खलाशाचा हा एक कठीण व्यवसाय आहे आणि आम्ही त्याबाबत मिळून काम करतो. असे प्रकार पूर्वीपासून घडत आले आहेत, पण आम्ही मिळून काम करतो. वुई लव्ह देम!!”
Modi-Trump meeting: Donald Trump heaps praise on Prime Minister Narendra Modi’s leadership; but…
महत्वाच्या बातम्या
- jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली
- Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला
- RSS : नोंदणीच्या राजकीय वादात आयकर विभागाने आणि न्यायालयाने कोणते निर्णय दिले होते??; वाचा सविस्तर!!
- महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण जाहीर; पाणीपुरवठ्याच्या दीर्घकालीन नियोजनावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी आणखी एक पाऊल!!