• Download App
    Modi's policies in Indonesia इंडोनेशियात करतो मोदींच्या धोरणांची कॉपी; इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची जाहीर स्तुती; भारतीय निवडणूक आयोगाची देखील सराहना!!

    इंडोनेशियात करतो मोदींच्या धोरणांची कॉपी; इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची जाहीर स्तुती; भारतीय निवडणूक आयोगाची देखील सराहना!!

    Modi's policies in Indonesia

    वृत्तसंस्था

    जाकार्ता : भारतात सर्व विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर शरसंधान साधत असताना इंडोनेशिया मात्र मोदींच्या धोरणांची कॉपी करतो, याची जाहीर कबुली आज इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जकार्ता येथील एका सामुदायिक कार्यक्रमात बोलताना इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो म्हणाले, “मला भारताच्या अंतर्गत राजकारणात पडायचे नाही. कारण मी सर्व भारतीयांचा मित्र आहे, पण मला एक गोष्ट कबूल करायची आहे आणि माझे जवळचे सहकारी याला दुजोरा देतील, की मी नरेंद्र मोदीजींचा वैयक्तिक मोठा चाहता आहे. मी काही व्यावसायिक राजकारणी नाही. मी व्यावसायिक राजकारणी नाही याचा पुरावा म्हणजे मी पाच सार्वत्रिक निवडणुका लढविल्या आणि त्यातील चार वेळा माझा पराभव झाला.



    – मोदींच्या धोरणांचा अभ्यास

    पण राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच मी पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांच्या धोरणांचा अभ्यास केला आणि त्यावर कोणताही “कॉपीराइट” नसल्यामुळे मी त्यांची अनेक धोरणे अनुसरली (कॉपी केली). पण पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने मला त्यांची धोरणे अनुसरण्याची परवानगी दिली; त्यामुळे माझ्यावर कोणत्याही न्यायालयात खटला भरला जाऊ शकत नाही…!!”

    – इंडोनेशियन भाषा ५० % संस्कृत

    प्राबोवो सुबियांतो पुढे म्हणाले, “इंडोनेशियातील लोकांनी भारताच्या अनुभवातून शिकले पाहिजे. आपली संस्कृती आणि सभ्यता भारतीय संस्कृती व सभ्यतेने मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. आमच्या भाषेतील सुमारे ५०% शब्द संस्कृतमधून आले आहेत. आमची अनेक नावेही संस्कृत आहेत. म्हणूनच, आपल्यात एक जवळीक आहे आणि आम्ही अधिक जवळच्या सहकार्याचे स्वागत करतो”

    – मोदींचा चाहता

    प्राबोवो सुबियांतो म्हणाले, “कोणत्याही राजकीय नेत्याबाबतचा धोका हा असतो की, एकदा का त्यांना व्यासपीठ आणि माईक मिळाला की ते तिथून खाली उतरायला तयार नसतात. मी भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत नाहीये, पण मी नरेंद्र मोदीजींचा वैयक्तिक चाहता आहे.”

    – भारतीय निवडणूक आयोगाचे अनुकरण

    प्रबोवो सुबियांतो म्हणाले, “माझे मंत्री आणि माझे जनरल, या सर्वांनाच नाचायला आणि गायला आवडते. कदाचित त्यातील बहुतेकांमध्ये भारतीय डीएनए (DNA) असावा. माझे बहुतेक मंत्री भारतीय गाणी अतिशय उत्तम प्रकारे गातात.” आम्ही इंडोनेशियाचशत भारताच्या निवडणूक आयोगाकडून खूप बारकाईने शिकत आहोत. खरं सांगायचं तर, आम्ही भारताकडे पाहतो – जो १.४ अब्ज लोकसंख्या असलेला देश आहे. तिथेही आमच्यासारखेच अनेक वांशिक गट आणि विविध प्रादेशिक भाषा आहेत; तरीही अनेक राज्यांमध्ये आणि खुद्द भारताच्या संघराज्यात सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण अनेक वर्षांपासून होत आले आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. मी याचा अभ्यास करत आहे आणि भारताच्या या उल्लेखनीय कामगिरीचे अनुसरण करत आहे.”

    Modi’s policies in Indonesia; public praise for the Indonesian President; and appreciation for the Election Commission of India as well!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Punjab Police : पंजाबला हादरवण्याचा कट उधळला; जालंधरमध्ये आयएसआय-समर्थित बीकेआयचा दहशतवादी अटक; 1.3 किलो आयईडीही जप्त

    संसदेतली कोंडी संपायची उद्या शक्यता; परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलणार राहुल + प्रियांका!!

    Siddaramaiah : सिद्धारामय्यांची घोषणा- 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही; म्हणाले- राजकारण भ्रष्ट झाले; दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपद सोडले होते