पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत भाष्य करण्यास मोदींचा नकार, मात्र त्याचवेळी सांगितली पंजाबमधली भावूक आठवण!!

 प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब मध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. हुसैनीवालाच्या पुलाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडकून राहिला. या मुद्द्यावर भाष्य करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली या प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू आहे. त्याचा निष्कर्ष चौकशी समिती सुप्रीम कोर्टाला सादर करेल. त्याविषयी आपण भाष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत पंतप्रधान मोदींनी खास मुलाखतीत व्यक्त केले.Modi refuses to comment on PM’s security flaws in Punjab

एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी बाबत भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी पंजाब मधली एक भावूक एक आठवण सांगितली. त्यावेळी पंतप्रधान त्यावेळी नरेंद्र मोदी हे पंजाब मध्ये भाजपचे संघटन मंत्री म्हणून काम करत होते.

राज्यात दहशतवादाने त्या वेळी कळस गाठला होता. पक्षाचा एक कार्यक्रम आटोपून संध्याकाळच्या वेळेला एका जुन्या कार मधून मोदी आपल्या कार्यालयाकडे परतत होते. परंतु उशीर झाला आणि गाडी बंद पडली. रस्त्याच्या कडेला अनेक प्रयत्न करूनही गाडी सुरू झाली नाही. त्यावेळी शेतात वस्तीला असलेल्या सरदार कुटुंबाने मोदींना झोपडीत नेऊन जेवायला दिले. त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. पंजाब मधले वातावरण तेव्हा दहशतग्रस्त होते. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणे धोक्याचे होते, या हे या सरदार परिवाराने मोदींना पटवून दिले. मोदी देखील चालकासह तिथे राहिले आणि दुसऱ्या दिवशी त्या सरदार परिवाराच्या मुलाने मेकॅनिक आणल्यानंतर गाडी दुरुस्त करून मोदींना त्या सरदार परिवाराने निरोप दिला.
ही आठवण नरेंद्र मोदी यांनी सांगितली.

गुजरात मधल्या सरदार परिवारांशी आपल्या जुन्या संबंधांच्या आठवणींनही त्यांनी उजाळा दिला. कच्छमध्ये अनेक सरदार परिवारांशी आपले वैयक्तिक संबंध आहेत. गुजरातच्या भूकंपाच्या वेळी तेथील गुरुद्वाराला खूप मोठे नुकसान झाले होते. परंतु आपण राजस्थानमधून कारागीर आणून ते गुरुद्वारा दुरुस्त करून पुन्हा उत्तम रित्या पूर्ववत केले, अशी आठवण देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितली.

पंजाब मध्ये छोट्या शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या योजनेचा मोठा फायदा झाला आहे आणि त्याबद्दल ते केंद्र सरकारचे कौतुक करतात, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. पंजाब मध्ये भाजपचे सुरुवातीच्या काळात काही राजकीय परिस्थितीमुळे दुर्लक्ष झाले असले तरी आता एक शक्ती म्हणून भाजपा तिथे उदयाला येत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Modi refuses to comment on PM’s security flaws in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात