विशेष प्रतिनिधी
मुंबई : मोदी निघाले मेकॉले निर्मित मानसिक गुलामगिरी संपवायला; उदयनिधी आणि ठाकरे बंधू निघाले भाषिक युद्ध लढायला!!, असे चित्र आज देशात दिसून आले. Modi pledged
अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्मध्वज फडकविल्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेकॉले निर्मित गुलामगिरीची मानसिकता संपविण्याचे आवाहन केले. 1835 मध्ये मेकॉलेने भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती आणून भारतीय शिक्षण पद्धतीला मागे ढकलले. भारतीय शिक्षण व्यवस्थेतल्या सगळ्या व्यवस्थांना दुय्यम ठरवत भारतीयांना गुलाम करण्यासाठी इंग्रजी शिक्षण व्यवस्था लादली.
भारतीय शिक्षण व्यवस्था सर्वगामी आणि सर्वंकष असताना तिला प्रतिगामी ठरवून इंग्रजी शिक्षण व्यवस्थेला पुरोगामी ठरविले. मात्र, भारतीय शिक्षण व्यवस्था आणि परंपरा अधिक उन्नत करून 2025 ते 2035 या दहा वर्षांमध्ये मेकॉले निर्मित गुलामगिरीची मानसिकता संपविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. इंग्रजी भाषा श्रेष्ठ आणि भारतीय भाषा दुय्यम या धोरणाला आमच्या सरकारने कधीच स्वीकारले नाही. इथून पुढेही स्वीकारणार नाही. उलट इंग्रजी जरी सध्या ज्ञानभाषा असली, तरी भारतीय भाषा सुद्धा आधुनिक ज्ञानाच्या भाषा बनविण्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला.
– उदयनिधी आणि ठाकरे बंधू
त्याच्या उलट महाराष्ट्रात ठाकरे बंधू आणि तामिळनाडूत एम. के. स्टालिन आणि उदयनिधी स्टालिन यांनी हिंदी भाषा लादायचा मुद्दा उगाळत गुलामगिरीची मानसिकता संपविण्याच्या मुद्द्याला भाषिक युद्धाचे स्वरूप दिले. आम्ही हिंदी लादून घेणार नाही. आम्ही भाषिक युद्ध लढण्यासाठी तयार आहोत, अशी दमबाजीची भाषा उदयनिधी स्टालिनने केली. याच दमबाजीच्या भाषेला महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी उचलून धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत केलेल्या आजच्या भाषणात या तिघांवरही जोरदार प्रहार केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App