Narendra Modi : आयटी फर्मच्या सीईओंसोबत मोदींची बैठक, एआय ते सेमीकंडक्टरवर चर्चा, भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

Narendra Modi

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Narendra Modi ) यांनी अमेरिकेत औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत ‘सार्थक’ गोलमेज परिषदेत भाग घेतला. यादरम्यान त्यांनी भारतात विकासाच्या शक्यतांवर भर देत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या पुढाकारांवर चर्चा केली. मोदी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ही बैठक लोट्टे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये झाली. बैठकीत एआय, क्वांटम कंप्युटिंग आणि सेमीकंडक्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानात काम करणाऱ्या अमेरिकेतील १५ प्रमुख कंपन्यांच्या सीईआेंनी भाग घेतला.

मोदी यांच्या पोस्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंसाेबत सार्थक गोलमेज परिषदेत भाग घेतला. तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि अन्य विषयांशी संबंधित पैलूंवर चर्चा केली. भारताप्रति आशावादी दृष्टीकोन पाहून मला आनंद वाटला. कंपन्या भारतात जगासाठी सहविकास, सहडिझाइन आणि सहउत्पादन करू शकते. मोदी म्हणाले, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्यांनी भारताच्या विकास गाथेचा लाभ उचलण्यााठी कंपन्यांना प्रोत्साहित केले.



 

गुगल भारतामध्ये एआय क्षेत्रात आणखी संधी शोधणार : सीईओ सुंदर पिचाई

सुंदर पिचाई यांनी ही बैठक अत्यंत यशस्वी झाल्याचे सांगितले. डिजिटल इंडिया व्हिजनसह भारताला पूर्णपणे बदलण्यावर पंतप्रधानांचा भर आहे. पिचाई म्हणाले की, मोदी सतत मेक इन इंडिया, डिझाईन इन इंडियावर भर देत आहेत. एआय भारताच्या कायापालटात कशी मदत करेल याचा पंतप्रधान खरोखरच विचार करत आहेत.

भारत सेमीकंडक्टर निर्मितीचे हब करण्यासाठी वचनबद्ध

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी मोदींच्या एआयसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबद्दल त्यांचे कौतुक केले. हुआंग म्हणाले की, मी मोदींसोबत अनेक भेटींचा आनंद लुटला आहे. मी जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा त्यांना भारतातील संधींबद्दल जाणून घ्यायचे असते. हा भारताचा क्षण आहे, तुम्हाला संधीचे सोने करावे लागेल.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या परिषदेत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ॲडोबचे सीईओ शंतनू नारायण, ॲक्सेंचरच्या सीईओ ज्युली स्वीट आणि एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग, आयबीएम सीईओ अरविंद कृष्णा, मॉडर्नाचे चेअरमन डॉ. नौबर अफयान उपस्थित होते. भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले.

Modi meets IT firm CEOs, discusses AI to semiconductors, calls for participation in India’s development journey

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात