दुबईतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार
विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीला (UAE) भेट देणार आहेत. UAE व्यतिरिक्त ते 14 आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कतारलाही जाणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील आणि अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.Modi leaves for two day visit to UAE and Qatar
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली. पीएम मोदींनी X वर पोस्ट केले की मी 13-14 फेब्रुवारी दरम्यान UAE आणि 14-15 फेब्रुवारी दरम्यान कतारला अधिकृत भेट देत आहे. ही माझी 2014 नंतरची यूएईची सातवी आणि कतारची दुसरी भेट असेल.
दौऱ्यावर जाण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी एक निवेदन जारी केले ज्यामध्ये त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “मला अबुधाबीमध्ये UAE चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना भेटण्याची आणि आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी व्यापक चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये प्रमुख पाहुणे होण्याचे भाग्य लाभले.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App