विशेष प्रतिनिधी
मुंबई : Modi वादग्रस्त बोलणे टाळा. एकमेकांचा द्वेष करू नका. आपापल्या मतदारसंघात लोकांच्या हिताचे काम करा. हे काम इतरांनी आवर्जून पाहण्यासाठी यावे असे असावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आयएनएस आंग्रे सभागृह येथे महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांशी वैयक्तिक संवाद साधला. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा तसेच संघटना वाढीवर भर देण्याचे निर्देशही िदले. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मोदींनी राज ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला. त्यातून त्यांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसे महायुतीत येणार असल्याचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.Modi
मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना, राज ठाकरे माझे काम पाहण्यासाठी गुजरातला आले होते. तुम्हीही असे काम केले पाहिजे, जेणेकरून इतर राज्यांतील लोकप्रतिनिधी तुमच्या विकासकामांचे मॉडेल पाहण्यास यावेत. मोदींनी राज यांचा सकारात्मक उल्लेख करणे हा आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजप मनसेसोबत युती करण्याच्या दिशेने काम करत आहे, याचाच संकेत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.
निवडणूक मार्गदर्शनाविषयी शिंदेसेना, भाजप आमदारांत विरोधाभास
आ. प्रकाश सुर्वे, आ. तुकाराम काटे (शिंदेसेना) : मोदींनी आगामी मनपा, नगर परिषद, जि.प. तसेच पंचायत समिती निवडणुका जिंकण्याबाबत तसेच जनतेशी कसे वागले पाहिजे आणि त्यांच्यासाठी कोणते काम करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
आ. संजय कुटे, आ. चित्रा वाघ, आ. स्नेहा दुबे (भाजप) : जनतेसाठी काम करताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. निवडणुकांच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करा.
मनपा-जि.प. निवडणुका जिंकण्याचा, संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना
आमदारांना मार्गदर्शन करण्यापूर्वी मोदींनी आयएनएस सुरत, आयएनस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौका, पाणबुडीचे राष्ट्राला लोकार्पण केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी उपस्थित होते.
धनंजय मुंडेंविषयी संजय राऊतांना दाटून आले प्रेम
मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंवर कायम टीका करणारे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी मुंडेंविषयी प्रेम दाटून आले होते. मोदींच्या उपस्थितीत झालेल्या महायुती आमदार संवाद कार्यक्रमात मुंडेंना वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, मोदींचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बहुतांश मंत्री उपस्थित होते. देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना जाणूनबुजून दूर ठेवण्यात आले. मोदींच्या मुंबईत आगमनाच्या एक दिवस आधी मुंडे बीडला रवाना झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंशी भेदभाव करत आहेत. महायुतीत अनेक कलंकित मंत्री आहेत, मग फक्त धनंजय मुंडे यांनाच मोदींच्या कार्यक्रमापासून का दूर ठेवण्यात आले? असा सवालही त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App